आमदार मुळशीचा हवा तर चेहरा बांदल साहेबांचा

0
2410

स्वराज्यनामा ऑनलाईन : व्यक्तिविशेष

                मुळशी तालुक्यात शिक्षणक्षेत्रात मानाने व अग्रभागाने घेतलं जाणारं नाव म्हणजे बावधन गावचे एक प्रभावी व्यक्तिमत्व अर्थात राजेंद्र बांदल. शिक्षण, उद्योग, शेती, सहकार, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांचा आवर्जुन आणि अदबीने उल्लेख केला जातो असे राजेंद्र बांदल हे एका शिक्षण संस्थेचे आणि पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष असून आपल्या कार्यामुळे सर्वत्र परिचीत आहेत.

                पुणे शहर व जिल्हा हिंदुत्ववादी चळवळीत ते सक्रीय असून सहकार, शिक्षण, उद्योग, शेती अशा क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. शहर असो  वा ग्रामीण भाग, ते सर्व पातळ्यांवर जन आंदोलनात सक्रीयतेने सहभागी राहिले आहेत. त्यांचा प्रभाव आणि वावर विविध क्षेत्रात दिसून येत असल्याने मोठा लोकसंचय त्यांच्याजवळ दिसून येतो.

                साहित्य, कला, क्रीडा, सांस्कृतिक, सामाजिक, सहकार आणि पत्रकारिता व राजकीय कार्यामुळे सर्वसामान्य तसेच उच्चविद्याविभूषीत व्यक्तींमध्ये आपली विशेष छाप पाडून आहेत. शहर व जिल्ह्यातील हिंदुत्ववादी तसेच आंबेडकरवादी विचारांच्या मतदारांशी थेट संपर्क असल्याने मुळशी तालुक्यात एक आश्वासक, उदयोन्मुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जातेय.

                भारतीय जनता पक्षाच्या मुळशी तालुका कार्याध्यक्ष पदाची धूरा त्यांच्या खांद्यावर आहे. ती त्यांनी लीलया पेललेली दिसते. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत त्यांनी पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पक्षाची तालुक्यात नुकतीच सुरवात असतानाही पक्षाची मोठी दखल घेतली जाईल अशीच कामगिरी त्यावेळी राहिली आहे. पक्षाला बळकटी मिळवून देण्याचं काम त्यांनी चोखपणे पार पाडलं आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याचा प्रसार त्यांनी यथायोग्यरीत्या केला आहे. पक्षाला आलेलं नवचैतन्य त्यांनी मुळशी तालुक्यात तेवत ठेवायला मोलाचं काम केलं आहे.

                चैतन्य विद्या प्रतिष्ठाणच्या पेरिविंकल इंग्लिश स्कूल या शैक्षणिक संस्थेच्या 4 शाखा त्यांनी स्वकष्टाने निर्माण केल्या असून येथे तालुक्यातील 4 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पेरिविंकलचा वटवृक्ष उभा करताना सचोटी, प्रामाणिकपणा, माफक आणि अल्प शैक्षणिक शुल्क, उच्च गुणवत्ता, चौफेर विविधांगी शैक्षणिक उपक्रम यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा ओढा या संस्थेकडे राहिला आहे आणि तो वाढतही आहे. बावधन, सुस, लवळे, पिरंगुट, पौड या मोठ्या गावांमध्ये या माध्यमातून थेट 20 हजार लोकांशी संर्पक आणि संवाद आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाचे शिक्षण अल्प शुल्कात उपलब्ध करून देण्याचा बांदल सरांचा मानस आणि उदात्त हेतू पाहता, भविष्यात त्यांचा आदर्श इतर संस्थाचालकांनी घ्यावा असाच आहे.

                हिमालय नागरी पतसंस्था, बावधन याच्या माध्यमातून तालुक्यात अर्थवाहिनी वाहत ठेवली आहे. सन 1995 मध्ये स्थापना झालेल्या पतसंस्थेने अनेक होतकरू तरूणांना व व्यावसायिकांना अर्थसहाय्य करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत केली आहे. या तरूणांच्या स्वयंरोजगाराला अर्थसहाय्याची जोड राजेंद्र बांदल सरांच्या पतसंस्थेच्या रूपाने मिळाल्याने, त्यांच्या शुभेच्छांच पाठबळ सरांच्या मागे हमखास असणार आहे. तसेच पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, कर्जदार असे एकुणच 5 हजार लोकांची मोठी रसद सरांना राजकीय रणांगणात यशस्वी करायला पुरेपुर उतरणार, यात शंका नाही.

                विविध उच्चाविद्याविभुषित व्यक्ति, पत्रकार, प्रशासकीय अधिकारी यांच्या आवडीचं असं एक मित्रत्वाचं नातं सरांनी आपल्या स्वभाव गुणामुळे जोडलं आहे. त्यांचा मित्रपरिवार मोठा तर आहेच, पण तरूणांचा मोठा पाठिंबा त्यांना मुळशी तालुक्यात पहायला मिळतो. शैक्षणिक क्षेत्रातील योगदानामुळे मुळशीच्या प्रतिभावंतांमध्ये त्यांचं नाव नक्कीच उंचावर असलेलं दिसतं. तशी वाचनाची त्यांना फार आवड असून ती त्यांनी खास पद्धतीने जोपासली देखील आहे. एक सुशिक्षित, अभ्यासू, सौम्य आणि शांत स्वभाव असलेलं हे व्यक्तिमत्वं भविष्यात राजकारण आणि समाजकारणात अग्रेसरच राहणार आहेत.

समाजकारण ते राजकारण : राजेंद्र बांदल यांचा प्रवास

                कुस्तीचा तालुका म्हणून ओळख असलेल्या मुळशी तालुक्यातून एक तरी महाराष्ट्र केसरी व्हावा, या उद्देषाने गेल्या 10 वर्षापासून तालुक्यात राबवल्या जाणार्‍या मुळशी केसरी स्पर्धेच्या आयोजनामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे. शैक्षणिक संस्थेत वर्षातून एकदा सलग 5 दिवस विविध खेळांचे आयोजन केले जाते. कारण सर्व प्रकारच्या खेळाडूंना त्यांचे कौशल्य दाखवायला, विकसीत करायला आणि पुढे जायला व्यासपीट मिळावे, हाच एकमेव उदात्त हेतू डोळ्यासमोर असतो. या स्पर्धेला महाराष्ट्र केसरी किताब धारक, गोल्ड मेडलिस्ट स्पर्धक आवर्जुन उपस्थित असतात.

                वारकरी संप्रदायातही मोठे योगदान देत भरीव मदत केली आहे. विठू माझा लेकूरवाळा अशा वारकरी बंधू भगिनिंना मदत तसेच किर्तनकारांना विविध पुरस्कार देऊन गौरविले आहे. धार्मिक सण, उत्सव, क्रिडा स्पर्धा यांनादेखील सहकार्य आणि सहाय्य असते.

                व्यावसायिकतेतून एक मोठा आदर्श त्यांनी समाजासमोर ठेवला आहे. हॉटेल व्यवसाय, कॉन्ट्रॅक्टींग व लाईझनिंग, सिक्युरीटी फोर्स ईत्यादी व्यवसायातून जवळपास 700 लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे.

                या अशा समाजकार्यातून अग्रेसर राहणारे बांदल हे अभ्यासू व्यक्तिमत्वं आत्तापर्यंत फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षाला प्राधान्य देत मतदान करत आलेले आहेत. हिंदूराष्ट्राची संकल्पना आणि धोरण, आर्थिक उदारीकरण, अखंड मानवतावाद आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांनी चालणारा भाजप पक्ष हाच अखंड हिंदूस्तानचा भाग्यविधाता असणार यात तिळमात्र शंका नाही.

आमदार मुळशीचा हवा तर चेहरा बांदल साहेबांचा

                भोर-वेल्हा-मुळशीचा समावेश असलेल्या भोर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडवण्यासाठी राजेंद्र बांदल हे स्वतः इच्छूक आहे. हा मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे आहे. मात्र हा मतदारसंघ भाजपकडे घ्यावा, अशी एकमुखी मागणी भाजप पदाधिकार्‍यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. जर ही मागणी यशस्वी झाली तर भारतीय जनता पक्ष भोर विधानसभेमध्ये परिवर्तन घडवू शकेल अशी आशा आहे.

                भारतीय जनता पक्ष येत्या विधानसभा निवडणूकीत राज्यात निवडून येणारा सर्वात मोठा पक्ष ठरणार असून, भोर विधानसभाही याला अपवाद नसणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे येथे सत्ताधार्‍यांनी तेवत ठेवलेल्या समस्या सुटायला मदत होणार आहे. जर भारतीय जनता पक्षाने राजेंद्र बांदल यांना उमेदवारीची जबाबदारी सोपवली तर ती विजयाकडे नक्कीच नेतील असा कयास आहे. त्यांच्या लोकसंपर्काचा यामध्ये सिंहाचा वाटा असणार आहे. तसेच माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारा नवमतदार यांचा वर्ग मोठा असल्याने भारतीय जनता पक्षाचा झेंडा भोर विधानसभेवर नक्कीच फडकेल, ही काळाची गरज आहे. असा सुशिक्षित, लोकसंपर्काची आवड जोपासणारा, जनतेच्या मुलभूत विकासाला प्राधान्य देणारा एक नवउमेदीचा आश्वासक चेहारा भोर विधानसभेचा आमदार झालेला पहायला नक्कीच मिळो. जनतेच प्रश्न सुटो आणि भोर विधानसभेवर भाजपचा ध्वज विराजमान होवो, हीच त्यांच्या हजारो पाठिराख्यांची आणि शुभेच्छुकांची आज तीव्र इच्छा आहे.

मा.राजेंद्र बांदल यांना मिळालेले पुरस्कार

1) कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षणरत्न पुरस्कार

2) राज्यस्तरीय जमशेदजी टाटा उद्योगरत्न पुरस्कार 2017-2018

3) मुळशीकरांचा माय मुळशी पुरस्कार

4) सहकार रत्न पुरस्कार असे 50 पेक्षा जास्त पुरस्कार

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here