शरद पवार यांच्यावरील ईडी कारवाईच्या विरोधात मुळशीत तीव्र निदर्शनं

0
1602
मुळशीत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची निदर्शनं

स्वराज्यनामा ऑनलाईन : माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) ने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ मुळशी तालुक्यात तीव्र निदर्शने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेवर संचालक नसतानाही ईडीने शरद पवार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असलेल्या पवारांवर केलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याची भावना व्यक्त करत राष्ट्रवादी व कॉंग्रेस या दोन्ही पक्षांनी संयुक्तपणे घोटवडे फाटा येथे निदर्शने केली.

          शरद पवार यांच्या सातारा, नगर व सोलापूर दौऱ्याला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे जाणून बुजून सूडबुद्धीने ही कारवाई होत असल्याची भावना कार्यकर्त्यांना व्यक्त केली आहे. कारवाई थांबवावी अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. 

          यावेळी सविता दगडे, सुभाष अमराळे, शांताराम इंगवले, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, महादेव कोंढरे, अंकुश मोरे, गंगाराम मातेरे, सुहास भोते, सुनील चांदेरे, दादाराम मांडेकर, सुनील वाडकर, अमित कंधारे, राजेंद्र मारणे, सुहास दगडे, माऊली कांबळे, निलेश पाडाळे, जितेंद्र इंगवले, योगेश ठोंबरे, सतीश सुतार, राकेश कांबळे, गणेश सुतार, सागर धुमाळ, मधुर दाभाडे, गणेश वाशिवले, लक्ष्मण भरेकर, शेखर शिंदे, महेश मानकर आदी उपस्थित होते. 

          मुळशीच्या जडणघडणीत शरद पवार यांचे मोठे योगदान असून संबंध नसताना कारवाई करणे ही राज्य सरकारची हुकूमशाही आहे, असे कॉंग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

          सविता दगडे, महादेव कोंढरे, गंगाराम मातेरे, सुनील चांदेरे, माऊली कांबळे, अंकुश मोरे, मधुर दाभाडे यांनी राज्य सरकारवर आपल्या भाषणातून तोफ डागली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here