उपनिरीक्षक अनिल मनोहर लवटे यांचा विशेष सेवा पदकाने सन्मान

0
454
पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांना सन्मानित करताना पोलिस अधिक्षक संदीप पाटील.

स्वराज्यनामा ऑनलाईन : पौड, ता. मुळशी येथील पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक अनिल मनोहर लवटे यांना पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते विशेष सेवा पदकाने सनमाणित करण्यात आले आहे.
गडचिरोली सारख्या नक्षलग्रस्त, अतिसंवेदनशील, अतिदुर्गम भागात लोकशाहीच्या रक्षणासाठी केलेल्या कठीण व खडतर कामगिरीची दखल घेत पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांना पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापञ देऊन सन्मानित करण्यात आले.
पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे यांना या शौर्यपुर्ण व अतुलनीय कार्याबद्दल पौडचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक महेश मोहिते, रेखा दुधभाते यांनी अनिल लवटे यांचे अभिनंदन केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here