भारत स्काऊट गाईडस् तर्फे घोटवडे शाळेचा गौरव

0
427
स्काऊट गाईडचा वतीने देण्यात येणारा सन्मान स्वीकारताना न्यू इंग्लिश स्कुल घोटावडेचे विद्यार्थी व शिक्षक.

स्वराज्यनामा ऑनलाईन : घोटावडे (ता. मुळशी) येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्यू इंग्लिश स्कुलचा भारत स्काऊटच्या वतीने गौरव करण्यात आला. यावेळी पुणे म.न.पा .शिक्षणाधिकारी दीपक माळी, जिल्हा मुख्य आयुक्त तांबे, मुळशी गटशिक्षणाधिकारी माणिक बांगर, दिनकर देशमुख, शकुंतला दगडे डुंबरे साहेब, परब साहेब, प्रदिप ताकवले, सुधाकर गुलडगडवार, उषा हिरावळे सुरेश घुले आदी उपस्थित होते.
शाळेतील राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थिनी पूर्वा भेगडे, सुप्रिया केदारी, सृष्टी तापकीर, सानिका भेगडे, गौरी भेगडे, तसेच गाईडर एम.एस. ववले यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शाळेतील स्काऊट गाईड उपक्रमास मुख्याध्यापक टी. के. वाघचौरे, एम. एस. ववले, एस. एम. सातव, एस. डी. मोहोळ, ए. डी. पिंगळे, जी. बी. पोंदकुले आदी शिक्षकांचे मार्गदर्शन झाले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here