केपीआर मिल

0
227

यावेळचा चकाकता हिरा म्हणून  केपीआर मिलचा विचार करता येईल. वस्त्रोद्योग कंपन्यातील ही एक मोठी कंपनी आहे. मार्च 2019 च्या पूर्ण वर्षाची विक्री 3384 कोटी रुपये होती. मार्च 2020 साठी ती 3857 कोटी रुपये होती. मार्च 2021 साठी ती 4282 कोटी रुपये व्हावी. या तीन वर्षांचा ढोबळ नफा अनुक्रमे प्रत्यक्ष/भविष्यकालीन 6442 कोटी, 7373 कोटी व 8165 कोटी रुपये व्हावा. शेअरगणिक उपार्जन या तीन वर्षांसाठी 46.15 रुपये, 52.85 रुपये, 60.36 रुपये व्हावा. सध्याच्या  भावाला किं/गु. गुणोत्तर 12.39 पट दिसते. पुढील दोन वर्षासाठी ते 10.82 पट व 9.47 पट इतके आकर्षक होईल. जून 2019 तिमाहीचा नफा नेहमीप्रमाणे वाढल्या प्रमाणावर असेल. प्रवर्तकांकडे भाग भांडवलापैकी 74.99 टक्के शेअर्स आहेत. त्यामुळे बाजारात अन्य निदेशकांसाठी फक्त 25.01 टक्के इतकेच उपलब्ध असतील. कंपनीला अरविंद लिमिटेड, इंडो काऊंट इंडस्ट्रीज यांची स्पर्धा असेल.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here