‘मन उधाण वारा’ चित्रपटाचे पोस्टर अनावरण

0
296

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा ‘मन उधाण वारा’ या मराठी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले. या चित्रपटाच्या निमित्ताने सतीश कौशिक मराठी चित्रपटसृष्टीत निर्माते म्हणून पदार्पण करत आहे. ‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मोनल गज्जर, रित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ. शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या ‘मन उधाण वारा’ या चित्रपटात भूमिका आहेत. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here