किरण दगडे महाराष्ट्रातील प्रभावी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष – प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील

0
768

सलग 6 व्या वर्षी दिवाळी सरंजाम भेट कार्यक्रमात भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, सिनेअभिनेते प्रवीण तरडे यांच्या हस्ते नागरिकांना सरंजाम भेट वाटप करण्यात आली.

नागरिकांना दिवाळी सरंजाम भेट कार्यक्रमात दगडेंच्या कोरोना काळातील कामाचे प्रदेशाध्यक्ष पाटील व अभिनेते प्रवीण तरडे यांच्याकडूून कौतुक

स्वराज्यनामा ऑनलाईन : महाराष्ट्रातील प्रभावी भाजपा युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षांमध्ये किरण दगडे यांचे नाव अग्रभआगाने घ्यावे लागते असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील यांनी व्यक्त केले. नगरसेवक किरण दगडे आयोजित प्रभागातील नागरिकांना दिवाळी सरंजाम भेट कार्यक्रमात सावरकर मैदान, कोथरूड येथे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. सलग 6 व्या वर्षी 5 हजार कुटुंबांना दिवाळी सरंजाम भेट वाटप करण्यात येत आहे.

            यावेळी पुणे मनपा सभागृह नेते धीरज घाटे, सुप्रसिद्ध सिनेअभिनेते प्रवीण तरडे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशिल मेंगडे, युवा मोर्चा पुणे शहराध्यक्ष बाप्पू मानकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, नगरसेविका डॉ.श्रद्धाताई प्रभुणे-पाठक, प्रभाग समिती अध्यक्ष-नगरसेविका हर्षाली माथवड, बावधन सरपंच पियुषा दगडे, युवा मोर्चा चिटणिस गणेश वरपे, स्विकृत सदस्य वैभव मुरकुटे, बाळासाहेब टेमकर, विलास मोहोळ, युवानेते धनंजय दगडे पाटील, प्रभाग 10 भाजपा अध्यक्ष सागर कडू, खडकवासला सरचिटणीस अजय मोहोळ, भाजपा कोथरुड उपाध्यक्ष रुपेश भोसले, बीडीपी समिती सभासद राजेश कुलकर्णी, डेव्हिड सर, प्रतिक वायकर, सुनिल तांबे, योगेश मोकाटे आदि उपस्थित होते.

            युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, कुटूंबासोबत सर्वच जण दिवाळी साजरी करतात, पण जनतेसोबत दिवाळी साजरे करणारे किरण दगडे हे आगळंवेगळं व्यक्तिमत्व आहे. कोरोनाच्या आणीबाणीतही दिवाळी सरंजाम वाटप कार्यक्रम घेत नगरसेवक दगडे यांनी लोकसेवेचा आदर्श उभा केला आहे. प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम घेण्यासाठी दिलदार पणा व समाजाप्रती प्रेम लागतं, ते दगडे यांच्याकडे ओतप्रोत भरलेलं आहे. त्यामुळे अशा होतकरू व भावी मोठ्या नेतृत्वाला जनतेने निवडून दिले आहे. त्याला सार्थ ठरवत दगडे यांनी कोरोना काळात मौल्यवान काम केलं आहे. भलेभले नेतेमंडळी घराबाहेर पडलेही नाही, त्याकाळात दगडे यांनी सर्वोत्तम असं काम केल्याने भविष्यात हे नेतृत्व नक्कीच मोठं झाल्याशिवाय राहणार नाही.  

            यावेळी बोलताना सिनेअभिनेते प्रवीण तरडे म्हणाले की, ती जनता भाग्यवान आहे जी नगरसेवक किरण दगडे यांच्या प्रभागात राहत आहे. कोरोना काळात औषध फवारणी सर्वप्रथम किरण दगडे यांनी सुरू केल्याचे आम्ही पाहिले. स्वखर्चाने नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर चालू केले व अनेक नागरिकांना मोफत उपचार दिले. मास्क, सॅनिटायझर, जीवनावश्यक किट्सचे शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाटप करून नागरिकांना कोरोना काळात मदत केली. दहा बाय दहाच्या घरात राहणाऱ्यांच्या व्य़था किरण दगडे जाणतात व त्यांना त्या सहृदयतेने सोडवता पण येतात, त्यामुळे भविष्यात हा शेतकऱ्यांचा सुपूत्र उज्वल कार्य करेल यात शंका नाही.

            यावेळी तरडे यांनी एक मोठा खुलासा केला, ते म्हणाले की त्यांचा “मुळशी पॅटर्न” हा चित्रपट दगडे यांच्या पाठिंब्यामुळेच प्रदर्शित झाला. मुळशी पॅटर्न मध्ये जसे आपल्याच परिसरातील कलाकारांना संधी दिली आहे, तशीच यापुढेही आपल्याच परिसरातील कलाकार मंडळींना संधी देणार आहे. प्रत्येक चित्रपटात शास्त्रीनगर, कोथरूड, मुळशी परिसरातील कलाकार दिसले आहेत तसेच आता यापुढेही असेल. शास्त्रीनगर वस्तीमधील कोण कलाकार असतील तर त्यांनी संपर्क साधावा, सिनेमात काम करण्याचा योग येऊ शकतो, असेही तरडे म्हणाले.

            यावेळी आयोजक नगरसेवक किरण दगडे म्हणाले की, प्रभागातील जनतेने मला भरभरून साथ दिली आहे, त्यांचा मी फार ऋणी आहे. त्यांच्यासाठी काम करत राहणं हेच माझं उद्दिष्ट आहे. बावधन भागात कोविड केअर हॉस्पिटल चालू करून चांगल्या दर्जाचे कोविड केअर सेंटर व उपचार केले आहेत. लोकांना अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. कचऱ्यासाठी गाडी उपलब्ध करून दिली, क्रीडासंकुल, आणि विविध सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या मुलावर टाकलेला विश्वास व उपकार कधीही विसरणार नाही, असे काम अखंड करत राहून जनतेचा विश्वास सार्थ ठरवणार आहे.

            दिवाळी सरंजाम किटमध्ये 1 किलो रवा, 1 किलो मैदा, 1 किलो, तेल 1 किलो पिठीसाखर, 500 ग्रॅम बेसनपीठ, डालडा 500 ग्रॅम,  भाजके पोहे 1 किलो, मिठपुडा 1 किलो, फुटाणा डाळ, 1 मोती गुलाब साबण, 1 उटणे असे साहित्य दिले आहे. नागरिकांना दिवाळीची भेट मिळाल्यामुळे नागरिक आनंदाने खुश झाल्याचे दिसत होते. सर्वत्र सोशल डिस्टंसिंग राखून योग्य पद्धतीने नियोजन करून केवळ अर्ध्या ते पाऊण तासात तिसऱ्या दिवशी बाराशे नागरिकांना सरंजाम भेट किटचे वाटप करण्यात आले. कोणताही गोंधळ नाही, गडबड नाही, सर्व लोकांना आधिच कुपन्स देऊन योग्य सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे चोख पालन करत हा वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here