पोलिसांचा चोरांना धोबीपछाड, लवासात बंगला फोडू पाहणारे चोर रंगेहाथ ताब्यात

0
1568

स्वराज्यनामा ऑनलाईन :  चोरी करत असताना मिळालेल्या माहितीच्या आधारे पौड पोलिसांनी सापळा रचून दोन चोरांना अटक केली. लवासा येथे एक बंगला फोडायच्या प्रयत्नात चोरांना पोलिसांकडून चांगलाच धोबीपछाड मिळाला आहे. या घटनेत दोन व्यक्तिंना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. मुळशीतील पौड पोलिसांची ही कामगिरी मात्र तालुक्यात चर्चेचा विषय ठरली आहे.

            याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुठा गावाच्या परिसरामध्ये पोलीस नियमित गस्त घालत होते. तेव्हा त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, लवासा येथे दोन अज्ञात व्यक्ती एका बंगल्याच्या पाठीमागील खिडकीच्या काचा फोडून चोरी करत आहेत. यावेळी पोलिसांनी अजिबात वेळ न दवडता घटनास्थळी धाव घेतली. लवासा येतील सिक्युरिटी इन्चार्ज सतीश पासलकर व अमित मोहन यांना सोबत घेऊन परिसराचा अंदाज घेत पोलिसांनी आपला सापळा रचला. पोलीस घरात घुसत आहेत, याची जाणिव होत असता चोरांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला. बंगल्याच्या खिडकीतून जंगलात हे चोर पळून जात असताना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अटक केलेल्या आरोपींची नावं गणेश चांगदेव जानकर  (रा.तांबट, ता.भोर, जि.पुणे) व कुशल बबन कोकरे (रा. बहिरवाडी ता.पुरंदर जि.पुणे) असे आहे.

            वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक अनिल लवटे, पोलीस नाईक सागर बनसोडे, पोलीस हवालदार संतोष कुंभार यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. आरोपींवर घरफोडीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक सागर बनसोडे हे करत आहेत.

स्वराज्यनामाचे Facebook Page लाईक करा. – Click Here

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here