राजेंद्र बांदल, निलेश दगडे व मित्रपरीवार यांकडून वचनपूर्ती, ५०० लोकांना धान्य-शिधा वाटप

0
444

स्वराज्यनामा  ऑनलाईन  : गरजुंना अन्न धान्य व शिधा वाटप जाहीर केल्याची वचनपूर्ती मुळशी तालुक्यात करण्यात आली आहे. मुळशी तालुका भाजपचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, माजी आदर्श सरपंच निलेश दगडे व मित्र परिवार यांनी ही वचनपूर्ती केली आहे. यामधून त्यांनी ५०० लोकांना धान्याचे कीट तसेच शिजवलेल्या अन्नाची २५० पाकीटे वाटप केली आहेत.

        कोरोना प्रतिबंधासासाठी लॉकडाऊन घोषित झाल्यानंतर गोर-गरीब परराज्यातील मजुर वर्ग किंवा परप्रांतीय गरजू यांचे खुपच हाल झाले. याकाळात या गरजू व गोर-गरीब परराज्यातील मजुर वर्ग अ्शांना अन्न -धान्य पुरवठा केला जाईल असे शासनाने सांगितले होते. मात्र शासनाच्या मदतीची वाट न बघता जाहिर केलेल्या मदतीची वचनपूर्ती म्हणून कोळवण गटामध्ये ऊसतोड कामगार, काशिग, नाणेगाव, दखणे, भालगुडी, चाले, करमोळी, उरवडे, मुगावडे, घोटावडे फाटा तसेच सुतारवाडी व पिरंगुट येथे लमाण, कामगार, भटक्या जाती जमातीतील गरजूंना मदतीची पुर्तता करण्यात आली आहेत.

        शिधा व अन्न वाटपाचा वसा मुळशीचे भाजपाचे कार्याध्यक्ष राजेंद्र बांदल, माजी आदर्श सरपंच निलेश दगडे, कॉंग्रेसचे युवा नेते मधुर दाभाडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष अमोल शिंदे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक दिलीप दगडे व पोपट दुडे, मंगेश दगडे, शिवसेना नेते रामभाऊ गायकवाड, युवा नेते राहुल पवळे तसेच मुगावडे गावातील तानाजी वाळुंज यांनी हाती घेतला. या सर्वांच्या सौजन्याने व उपस्थितीत योग्य ती काळजी व सुरक्षित अंतर ठेवून गरजुंना ५०० पाकीटे धान्य व २५० पाकीटे शिजवलेले अन्न असे या सर्वांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

        पिरंगुट येथे पोलिस कर्मचारी व पोलिस अधिका-र्यांच्या हस्ते देखील चाळीतील भाडेकरुंना अऩ्न धान्य वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गरीब वर्गाला अन्न धान्याचा तुटवडा जाणवू नये यासाठी यांनी घेतलेला हा वसा निश्चितच हातावर पोट असणा-र्या गरीब व गरजुंसाठी एक वरदानच ठरला आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here