पिरंगुट येथे आढळला मुळशीतील पहिला कोरोना रूग्ण, प्रशासनाची तत्काळ धाव

0
31482

स्वराज्यनामा  ऑनलाईन  : मुळशी तालुक्यात पिरंगुट येथे कोरोना पहिला  रुग्ण सापडला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित करंजकर यांनी दिली आहे. सदर ठिकाणी प्रशासनाने तत्काळ धाव घेत पुढील कार्यवाही सुरू केलेली आहे.

            पिरंगुट येथील मुसलमान मोहल्ला घरातील एका महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे. दोन दिवसापूर्वी या महिलेला निमोनिया झाला म्हणून येथील एका खाजगी दवाखान्यात ऍडमिट केले होते. त्यावेळी तिची कोरोना टेस्ट करण्यात आली तर ती पॉझिटिव्ह निघाली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

            सगळ्यात भयानक बाब म्हणजे त्या दवाखान्यात या तीन दिवसांमध्ये किती रुग्ण आले आणि गेले त्या सर्वांची माहिती घेऊन त्या डॉक्टर सहित त्यांचे कर्मचारी त्यांना बंदिस्त करणे गरजेचे आहे.

            माहिती मिळताच तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण, गटविकास अधिकारी संदीप जठार, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अजित करंजकर यांनी पिरंगुट येथे धाव घेतली. अजूनही त्याच घरातील दोघांना कोरोना पॉझिटिव्ह असण्याची शक्यता आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here