घोटवडे फाटा येथे शिवभोजन थाळीस सुरवात, गरीब व गरजूंना मिळणार लाभ

0
908

स्वराज्यनामा ऑनलाईन  : कोरोनासारख्या भयंकर रोगाने थैमान घातल्यामुळे राज्यासह संपूर्ण देश हवालदिल झाला आहे. मात्र अशा काळातही सर्व काही लॉकडाऊन असताना महत्वकांशी शिवभोजन थाळी घोटवडे फाटा, ता.मुळशी येथे सुरू झाली आहे. गरीब व गरजू अशा 100 लोकांना त्याचा लाभ होणार आहे. अवघ्या 10 रुपयांत मिळणारी शिवभोजन थाळी कोरोनाच्या महाभयंकर संकट काळात केवळ आणि केवळ 5 रुपयांत मिळणार आहे.

            यावेळी तहसिलदार अभय चव्हाण, गंगाराम मातेरे, शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, मधुर दाभाडे, निलेश दगडे, राहुल जाधव, अमोल शिंदे आदि उपस्थित होते. आमदार संग्राम थोपटे यांच्या सूचनेनुसार व मुळशी तहसिलदार चव्हाण, शिवाजी बुचडे पाटील, आदिवासी कल्याण संघ व मुळशी तालुका काँग्रेस कमिटी यांच्या प्रयत्नातुन घोटावडे फाटा, ता.मुळशी येथे शिवभोजन थाळी योजना सुरू करण्यात आली आहे. त्याचबरोबर रोजचे 100 गरीब व गरजू लोकांनाही मोफत जेवण चालू केले आहे. सदर उपक्रम चालवण्यासाठी शंकर बत्ताले, उज्वल ववले, शेखर हुलावळे हे तरूण प्रयत्न करत असून आमदार थोपटे, काँग्रेस कमिटी, मुळशी तहसीलदार हे त्यांस मार्गदर्शन करत आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here