कोरोना प्रतिबंधासाठी निर्जंतूकीकरण, जनजागृती – नगरसेवक किरण दगडे यांचा प्रयत्न

0
440

बावधन, ता.मुळशी येथे सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करून निर्जंतुक करत असताना.

स्वराज्यनामा ऑनलाईन  : कोरोनाच्या धर्तीवर नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांच्या वतीने बावधन तसेच कोथरूड येथे कोरोना वरती प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्जंतुकरण करण्यात आले आहे. सर्व परिसराची स्वच्छता करून लोकांना घरोघरी जाऊन प्रबोधनही करण्यात येत आहे.

            बावधन व कोथरूड हा पुणे शहरातील आयटीएन्सचा निवारा असलेला परिसर आहे. उच्चभ्रू नागरीकांची येथे मोठी वसाहत आहे. त्यामुळे विशेष असे प्रयत्न करून किरण दगडे व पियूषा दगडे यांच्या प्रयत्नांतून कोरोना फैलावासाठी प्रतिबंध करण्यात आल्याने कौतुकास्पद आहे. बावधन व प्रभाग क्र.१० मध्ये सार्वजनिक ठिकाणी सोडीयम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली आहे.

            दगडे यांना बावधन व कोथरूडकरांची काळजी असल्याने त्यांनी तत्परतेने हे पाऊल उचचले असून लवकरच नागरीकांना सॅनीटायझरही वाटप करण्यात येणार आहे. तसेच स्वतः प्रत्येक सोसायटीत व भागात वैयक्तिक फिरून सर्वांनी काळजी घेऊन मास्क, सॅनिटायझर वापरावे, सर्दी-खोकला-ताप असलेल्या व्यक्तिंनी स्वतःला घरात घरातील व्यक्तिंपासून लांब ठेवावे, तसेच स्वतः हाताळलेल्या वस्तू घरातल्यांच्या सानिध्यात येणार नाही, याची काळजी घ्यावी अशी जनजागृती करत आहेत.

बावधन येथे निर्जुंतुकीकरणाचे काम चालू असताना उपस्थित नगरसेवक किरण दगडे व मित्र परिवार.
ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here