खेळांमधुन स्त्री जनजागृतीचे प्रबोधन करून भरे येथे महिला दिन साजरा

0
284

भरे, ता.मुळशी येथे खेळामधुन स्त्री जनजागृती करुन महिला दिन साजरा करण्यात आला.

स्वराज्यनामा ऑनलाईन  : विविध खेळांमधून महिलांना प्रबोधन करत भरे,ता. मुळशी येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि मॅजिक बस इंडीया फाऊंडेशन यांचा संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळेत महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक खेळांमधुन स्त्री-पुरुष समानता, बाल विवाह रोखणे आणि बालमजूरी थांबवणे असे स्त्री जनजागृतीचे संदेश उपस्थित महिलांना देण्यात आले.

            यावेळी सरपंच संगिता खरात, उपसरपंच आरती पानसरे, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष स्वाती मत्रे, उपाध्यक्ष भारती पानसरे, मॅजिकं बस इंडिया फाऊंडेशन व्यवस्थापक उमेश साळवे, मुख्याध्यापिका सुनीता कांबळे, उपशिक्षिका संद्यारानी गाडे, सुवर्णा गिरी, सुवर्णा सातपुते, सुवर्णा ससार, अनिता विभंदोक त्याचबरोबर मॅजिक बसचे प्रदीप शिंदे, प्रियंका कदम तसेच ग्रामस्थं महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या. यावेळी सर्व विजेत्या व उपस्थित महिलांना बक्षिसे देण्यात आली व सर्व शिक्षकांचे सत्कार करण्यात आले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here