मारूंजी येथील आगीत दोन दुकानांचे नुकसान, अग्निशमन दलाच्या तत्परतेने आग नियंत्रणात

0
389

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  मारुंजी, ता.मुळशी येथे मध्यरात्री आगीमुळे दोन दुकानांचे प्रचंड नुकसान झाले. येथील ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या आदेश्वर सीट कव्हर आणि शेजारील चायनीज टपरीचे मोठे नुकसान झाले आहे. पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

            शुक्रवारी (दि.६) रात्री दीडच्या सुमारास हिंजवडी मारूंजी रस्त्यालगत हि घटना घडली. ग्रामपंचायत कार्यालय आणि जिल्हा परिषद शाळेच्या जवळ मुख्य रस्त्यालगत असलेल्या आदेश्वर सीट कव्हर या दुकानातून मध्यरात्रीच्या सुमारास अचानक मोठ्या प्रमाणावर धूर येऊ लागला.  दुकानात वाहनांचे सीट कव्हर्स, कुषण साठा असल्याने आग भडकल्याने बाजूला असलेले चायनीज दुकानाला सुद्धा आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच चायनीज सेंटरमधील तिन गँस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

            पीएमआरडीए अग्निशमन दलाचे उपस्थानक अधिकारी विजय महाजन, सुरज इंगवले, हितेश आहेर, संदीप तांबे, संदीप शेळके, प्रकाश मदने, राहुल शिरोळे, मायनाळे, काळे, गोसावी, गायकवाड, कोरडे या अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here