एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे घवघवीत यश

0
335

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने मोठे घवघवीत यश मिळविले आहे. संस्थेचा एलिमेंटरीचा निकाल ९७.७९ तर इंटरमिजिएटचा ९८.१० टक्के लागला आहे. दोन्ही परीक्षेत संस्थेतील ३९ शाळा ‘शंभर नंबरी’ ठरल्या आहेत. यशस्वी विद्यार्थी आणि शाळांचे उपमुख्यमंत्री, संस्थेचे अध्यक्ष अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे. शासनाच्या कला संचालनालय यांच्यावतीने या परिक्षा घेण्यात आल्या होत्या.

            एलिमेंटरीत संस्थेच्या ५७ शाळांतील २२१८ पैकी २१६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १०९ विद्यार्थ्यांना अ आणि ५०६ विद्यार्थ्यांना ब श्रेणी मिळाली. तर इंटरमिजिएट परीक्षेत १७९० पैकी १७५६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात १८५ विद्यार्थी ‘अ’ श्रेणीत तर ५४४ विद्यार्थी ‘ब’ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

            नसरापूर, अणे, बोरी, उंब्रज, न्हावरे, सांगवी, देहूरोड, येणेरे, ओझर, नानगाव, वेल्हा, घोटवडे, खानापूर, चांदखेड, वडगावशेरी, मोशी, चिखली, मुठा, शिंद, डाळज, इनामगाव, मांडकी, पडवी, संविदणे, पारगावतर्फे खेड, खडकी, केसनंद, उत्तमनगर, उरळगाव, शिरोली, दौंड, इंग्लिश मिडीयम आकुर्डी, खराडी या ३३ शाळा दोन्ही परीक्षेत शंभर नंबरी ठरल्या आहेत. तर एलिमेंटरीमध्ये पिरंगुट, पानशेत, शिवणे, कोळवण, करडे, इऑन ज्ञानांकुर आणि इंटरमिजीएटमध्ये सूपे, पौड, शिरोली, कामशेत, मुंढवा, लोहगाव, शेरे, वाणेवाडी, आकुर्डी, कळस, डोणजे या शाळांचे निकाल १०० टक्के लागले आहेत.

            याबाबत संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अॅड.संदीप कदम म्हणाले की एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट परीक्षेसाठी संस्थेने शिक्षकांसाठी प्रशिक्षणे घेतली होती. कला अध्यापकांनीही जादा मेहनत घेवून विद्यार्थ्यांच्या तयारी करवून घेतली. वास्तविक दरवर्षी या परीक्षा सप्टेंबर महिन्यात घेतल्या जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना सरावाला कमी वेळ मिळतो. दोन महिन्यात विद्यार्थ्यांची अपेक्षित तयारी होत नाही. त्यामुळे संस्थेने दिवाळी सुट्टीनंतर दुसर्‍या सत्रात विद्यार्थ्यांचे जादा तास सुरू करून अधिकचा सराव करून घेतला. त्यामुळे यावर्षी ऩिकालाचा टक्का वाढला असून अ व ब श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. यावेळी खजिनदार अॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार सहसचिव ए.एम.जाधव आदि उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here