पोलिस व अग्निशमन दलाची तत्परता, घोटवडे फाट्यावरील दुकानं भस्मसात होण्यापासून वाचली

0
899

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  आज पहाटे 4 वाजता घोटवडे फाटा, ता.मुळशी येथे बालाजी किराणा स्टोअर ला अचानक मोठी आग लागली होती. भयंकर आग लागल्याची माहिती मिळता पौड पोलिसांनी तत्परतेने मारूंजी अग्निशमन दलाला कळवले. त्यांनीही त्वरित प्रतिसाद देत ही आग आटोक्यात आणण्यात मोठी तत्परता दाखवल्याने आग शमली. त्यामुळे मोठी वित्तहानी टळली आहे. तसेच आजुबाजूच्या 10-15 दुकानांना नुकसान झाले असते, ते ही सुदैवाने टळले आहे.

            पिरंगुट, ता.मुळशी जवळ घोटवडे फाटा येथे बालाजी किराणा स्टोअर आहे. त्याला आग लागल्याचे पहाटे 4 वाजता आग लागल्याचे पोलिस शिपाई महेश पवार व पोलिस नाईक तडवी यांनी तत्काळ वरिष्ठांना कळवले. पोलिस उपनिरिक्षक अनिल लवटे, सहाय्यक फौजदार शितोळे, चालक हगवणे हे त्वरित घटनास्थळी पोहोचून तात्काळ अग्निशामक दल मारुंजी यांच्याशी संपर्क साधला. अनिशमन दलाने ही आग त्वरित आटोक्यात आणली.

            त्यामुळे आज पोलिसांच्या सतर्कतेमुळे व अग्निशामक दल, मारुंजी यांच्या तत्परतेने याठिकाणी बाजूची दहा ते पंधरा दुकानाचे नुकसान होण्यापासून वाचलेले आहे. या सर्व घटनेची माहिती पोलिस उपनिरिक्षक अनिल लवटे यांनी दिली असून पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी सर्व पोलिस व अग्निशमन दलाचे कौतुक केले आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here