वटवृक्षापरी असणाऱ्या आजी-आजोबांचा सुसच्या पेरिविंकल स्कूलमध्ये स्नेह मेळावा संपन्न

0
662

स्वराज्यनामा ऑनलाईन  :   आजी-आजोबांची माया म्हणजे नातवंडांसाठी लाभलेली वटवृक्षाची छायाच असते. याच आजी-आजोबांचा स्नेह मेळावा अर्थात ‘ग्रॅंट पॅंरेट्स डे’ सुस, ता.मुळशी येथे चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविकंल इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. चिमूरड्या नातवंडांनी आपल्या आजी आजोबांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

            या कार्यक्रमात आजी-आजोबांसाठी विविध मनोरंजनात्मक स्पर्धांचे आयोजन केले गेले होते. त्यात आजी आजोबा मोठ्या उत्सहात सहभागी झाले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. तसेच काही आजी-आजोबांनी आपले मनोगत व्यक्त केले. वर्षभरात घेतल्या गेलेल्या स्पर्धांच्या विजेत्या विद्यार्थांना आजी-आजोबांकडून गौरविण्यात आले.

            मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी या ‘ग्रॅंट पॅंरेट्स डे’ कार्यक्रमाचे आयोजन सुसगाव शाखेच्या मुख्याध्यापिका स्वाती पवार व पर्यवेक्षिका शिल्पा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका प्रज्ञा मुळे यांनी केले असुन सर्व शिक्षक वर्गाच्या सांघिक यशामुळे हा कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here