नागरिकत्वं कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांना धोका नाही – केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले

0
392

स्वराज्यनामा ऑनलाईन : नागरिकत्वं कायद्यामुळे भारतीय मुस्लिमांना धोका नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बावधन, ता.मुळशी येथे व्यक्त केले. बावधन येथील दुमजली बुद्ध विहाराचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

            बावधन गावाचा अनेक वर्षे प्रलंबित पाण्याचा प्रश्न रिपाइं भाजप युतीमुळे सोडविण्यात आल्याची माहिती येथील नगरसेवक किरण दगडे पाटिल यांनी यावेळी दिली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रिपाइं पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष परशुराम वाडेकर, आयुब शेख, अशोक शिरोळे तसेच बावधनच्या सरपंच पियुषा दगडे पाटील, माजी सरपंच वैशाली कांबळे, रिपाइं युवक आघाडी जिल्हा अध्यक्ष उमेश कांबळे, महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड अध्यक्ष सतिश केदारी, मयूर कांबळे व विविध मान्यवर उपस्थित होते.  

            ३० लक्ष रुपये निधी खर्च करून हे दुमजली बुद्धविहार उभारण्यात आले असून या वस्तू मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह, अत्याधुनिक वाचनालय, तसेच व्यायामशाळा ही उभारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

            महाराष्ट्रात आणि देशात सरकार कुणाचेही असो सरकार मधील मंत्री मला मदत करतात. महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध असल्याचे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

            आठवले पुढे म्हणाले की, या कायद्यानुसार पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशातील मुस्लिमांना वगळून हिंदू, बौद्ध, शीख, ख्रिश्चन या शरणार्थींना भारतात नागरिकत्व दिले जाईल. पाक, अफगाण आणि बांगलादेशातील मुस्लिम भारतात मोठया संख्येने घुसून भारताला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून सी ए ए कायद्यात मुस्लिम शब्द वगळला आहे.

            भारतीय मुस्लिमांना या कायद्यानुसार कोणी देशाबाहेर काढू शकत नाही. केंद्र सरकार भारतीय मुस्लिमांच्या पाठिशी आहे. जर कोणी भारतीय मुस्लिमांना देशा बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांनाच आम्ही बाहेर काढू असा ईशारा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिला. 

            छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी सर्व जाती धर्माचे मावळे एकत्र केले त्याप्रमाणेच महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे सर्व जाती धर्मियांना एकत्र केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संविधानासमोर नतमस्तक होऊन सर्वांना सोबत घेऊन सर्वांचा विश्वास जिंकत सर्वांच्या विकासासाठी सरकार चालवत आहेत. मोदी सरकारचा संविधानाला पाठिंबा आहे संविधानाच्या रक्षणासाठी मी हाती निळा झेंडा घेऊन सरकार सोबत आहे असे ना रामदास आठवले यावेळी म्हणाले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here