पेरिविंकल स्कूलच्या बावधन शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात

0
487

स्नेहसंमेलनास आवर्जुन उपस्थित असलेले माजी मंत्री महादेव जानकर उपस्थितांना संबोधित करताना

स्वराज्यनामा ऑनलाईन :    चैतन्य विद्या प्रतिष्ठानच्या पेरिविंकल इंग्लिश मिडीयम स्कूल, बावधन शाखेचे स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. मुळशी तालुक्यात प्रथितयश असे पेरिविंकल स्कूल ओळखले जाते. त्यामुळे स्नेहसंमेलनाला आवर्जुन अनेक मान्यवर उपस्थित असतात. 

              यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, शिक्षण अधिकारी श्री.दर्शले, बावधनच्या सरपंच पियुषा दगडे, नगरसेवक सचिन दोडके, बाणेरच्या नगरसेविका स्वप्नाली सायकर, जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, नगरसेविका छाया मारणे, उद्योजक प्रशांत नाहर, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र बांदल, संचालिका रेखा बांदल, बावधनच्या उपसरपंच रंजना दगडे, माजी उपसरपंच बापू दगडे आदी मान्यवर उपस्थित होते.

              ‘सणांची विविधता’ अशी स्नेहसंमेलनाची थीम होती. त्यास अनुसरून एक ये बढकर एक अशी बहारदार नृत्य विद्यार्थांनी सादर केले. दीपप्रज्वलन, स्वागत गीत, गणेश वंदन विद्यार्थ्यांनी सादर करत उपस्थितांची मने जिंकली. टाळ्यांच्या कडकडाटात माउली….. माऊली, शिवाय,  गणपती… कव्वाली, राधे राधे असे एका पेक्षा एक बहारदार नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सादरीकरण करताना विद्यार्थ्यांनी विमानतळाचा देखावा सादर केला होता. तसेच संपूर्ण सूत्रसंचालनही विद्यार्थ्यांनी केले.

             विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या व इ १० वी त प्रथम ३ क्रमांकाला बक्षिस देण्यात आले. बक्षिस वितरण सोहळ्यात सर्व मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा बक्षिस व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला

             अनेक पर्याय उपलब्ध असूनही पेरिविंकलच का? याचा प्रत्यय आज येथे आला. एक शेतकर्‍याचा मुलगा एक शाळाच नव्हे तर ५ शाखा चालवतो अशा प्रकारे पेरिविंकल ही एक युनिव्हर्सिटी व्हायला वेळ लागणार नाही आणि काही काळातच बांदल सरांचे यश बघता ते येणाऱ्या काही काळात शिक्षण मंत्री नक्कीच होतील व शाळा खूप प्रगतीपथावर असेल असे मत माजी मंत्री महादेवराव जानकर यांनी व्यक्त केले.

             पेरिविंकल मधील प्रत्येक विद्यार्थी हा माझा आहे व त्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देणे याची पूर्ण जबाबदारी ही शिक्षक व शाळेची आहे व ती पूर्णपणे पार पाडण्याचा प्रयत्न करूच अशी शाश्वती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री राजेंद्र बांदल यांनी पालकांना दिली. केजी टू  पीजी म्हणजेच पालकांनी आपल्या पाल्याला केजी मध्ये प्रवेश घेतला की पीजी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री हातात घेऊनच बाहेर पडेल अशी हमी संस्थेचे संस्थापक राजेंद्र बांदल यांनी सर्व पालकांना दिली.

             स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका रोहिणी कुलहळ्ळी यांच्या अध्यक्षतेखाली पर्यवेक्षिका निर्मल पंडित, रूचिरा खानविलकर, रश्मी पाथरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने व सहयोगाने शिस्तबद्ध पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभा कुलकर्णी, शिवांगी बिरारी, झीनत शहा व ४ थी आणि ९ वी च्या विद्यार्थ्यांनी केले होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here