महाराष्ट्रातील अवघड ‘लिंगाणा’ सुळका अवघ्या चार वर्षीच्या सह्याद्रीकडून सर

0
497

स्वराज्यनामा ऑनलाईन    :    चार वर्षाच्या चिमुकलीने लिंगाणा किल्ला दोराच्या सहाय्याने सर केला आहे. पुण्यातील भोसरीमध्ये राहणाऱ्या चार वर्षीय सह्याद्री महेश भुजबळ या चिमुकलीने ही किमया साध्य केली. अतिशय अवघड आणि आव्हानात्मक असलेला किल्ला सर केल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणाही सह्याद्रीने दिल्या. तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

           लिंगाणा किल्ला दोराच्या सहाय्याने सर करणे हे वाटते तितके सोप्पे नाही. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सह्याद्रीने अवघड निसरड्या वाटा, कातळ टप्पे पार करत किल्ले लिंगाणाचे गगनचुंबी शिखर सर करणे आणि किल्ल्यावर पोहचून भगवा ध्वज फडकावणे हे लिलया करून दाखवले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे रक्षण आणि संवर्धनाचा संदेशही तिने या माध्यमातून दिला आहे.

           सह्याद्री ला वडील महेश भुजबळ यांच्यामुळे गडकिल्ले फिरण्याची आवड निर्माण झाली. तीने आपल्या बालवयातच किल्ले सफरींच्या छंदाला गवसणी घातली आहे. आतापर्यंत सह्याद्रीने रायगड, लोहगड, सिंहगड, तुंग, हडसर, शिवनेरी, जंजिरा, सुधागड, पन्हाळा, मल्हारगड, राजमाची, तोरणा आणि राजगड असे अवघड समजले जाणारे किल्ले सर केले आहेत.

           अनेक मान्यवरांनी तिच्या या धाडसीपणाबद्दल तिचे कौतुक केले व शुभेच्छाही दिल्या आहेत. लिंगाणा मोहिमेला शिलेदार सागर नलावडे यांचे विषेश सहकार्य लाभले आहे. अनेक किल्ले सर करून छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा रक्षणाचा व संवर्धनाचा संदेश देणार असल्याचे सह्याद्रीने सांगितले.

आमचं फेसबुक पेज लाईक करा.              http://fb.com/swarajyanama

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here