मुळशीकर महापौर मुरलीधर मोहोळ यांचा मुळशीकरांच्या वतीने होणार जाहिर सत्कार

0
562

स्वराज्यनामा ऑनलाईन :  पुणे शहराचे नवनिर्वाचित महापौर मुळ मुळशीकर असलेले मुरलीधर मोहोळ यांचा समस्त मुळशीकरांच्यावतीने जाहिर सत्कार करण्यात येणार आहे. मंगळवार दि.१७ डिसेंबर रोजी भुगाव येथील सिद्धी लाँन्स मंगल कार्यालय येथे हा सत्कार समारंभ होणार आहे.

            पहिल्यादांच मुळशी तालुक्याच्या इतिहासात मुळशीकर असलेले, माजी स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर (आण्णा) मोहोळ यांची नुकतीच पुणे शहराच्या महापौर पदी निवड झाली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक असलेल्या आण्णांचा मुळशीतील सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी गौरव करण्याचे निश्चित केले. यानिमित्ताने असा हा राजकीय मुळशी पॅटर्न राजकारणात नवी दिशा व मार्गदर्शन करणारा नक्कीच ठरेल यात शंका नाही.

             माजी खासदार नानासाहेब नवले, माजी खासदार अशोकराव मोहोळ यांच्या शुभहस्ते हा मुळशीकरांच्यावतीने सत्कार दिला जाणार आहे. तसेच यावेळी मुळशी तालुका पत्रकार संघातर्फेही आण्णांचा विशेष सत्कार केला जाणार असल्याची माहिती अध्यक्ष विनोद माझिरे व सचिव विजय वरखडे यांनी दिली.

             या समारंभास तालुक्याचे जेष्ठ नेते तुकारामभाऊ हगवणे, माजी जि.प.अध्यक्ष आबासाहेब ढमाले, कात्रज दुध संघ मा.चेअरमन रामभाऊ ठोंबरे, मा.आमदार शरदभाऊ ढमाले, शिवसेना बारामती संपर्क प्रमुख सत्यवानजी ऊभे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता दगडे, सभापती राधिका कोंढरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, शिवसेना तालुका प्रमुख संतोष मोहोळ, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गंगाराम मातेरे, भाजप तालुकाध्यक्ष विनायक ठोंबरे, मनसे तालुकाध्यक्ष गणेश जोरी, आरपीआय तालुकाध्यक्ष सतिश केदारी, समस्त वारकरी समाज, आजी-माजी जि.प.सदस्य, पं.स.सदस्य, सरपंच, पोलिस पाटील व समस्त मुळशीकर उपस्थित राहणार आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here