भुगावमध्ये काकड आरती सोहळ्याची सांगता उत्साहात

0
1334

स्वराज्यनामा ऑनलाईन : भुगाव, ता.मुळशी येथे काकड आरती सोहळ्याच्या समारोपानिमित्त काल्याचे किर्तन पार पडले. भुगावच्या श्री.विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात ह.भ.प. संतोष महाराज सुर्वे यांच्या सुश्राव्य किर्तनाने उपस्थित ग्रामस्थं मंत्रमुग्ध झाले.
               गेली 54 वर्षे कार्तिकस्नान महिन्यामध्ये पुर्ण महिनाभर पहाटे 4 ते 7 या वेळेत भुगावमध्ये काकड आरती संपन्न होत असते. या काकड आरतीची सांगता काल्याच्या किर्तनाने होतेे. मंगळवारी हा सांगता समारंभ मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात आनंदमय वातावरणात संपन्न झाला. किर्तनानंतर भाविकांना महाप्रसादही ठेवण्यात आला होता.
               भुगावचे विठ्ठल मंदिर हे अतिशय पुरातन असे पांडवकालीन मंदिर आहे. मंदिरामध्ये पद्मावती महिला भजूी मंडळाचा नित्य हरिपाठ होतो. पुणे शहरालगत असलेले भुगाव धार्मिक कार्यात नेहमीच पुढे असते. ग्रामस्थं व तरूणांच्या पुढाकाराने हे कार्यक्रम उत्साहात पार पाडले जातात.
               काकड आरती सोहळयासाठी गावातील प्रत्येक घरातून तांदुळ व रोख स्वरूपात वर्गणी गोळा केली जाते. मोठा अन्नकोट काल्याच्या दिवशी केला जातो. 2 ते 3 हजार भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात. व्यवसाय व नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले ग्रामस्थं सुद्धा या कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित राहतात.

श्री. विठ्ठल-रूक्मिणी मंदिर, भुगाव, ता.मुळशी येथे काल्याच्या किर्तनास उपस्थित महिला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here