मुळशीत मतदान उत्साहात सुरू, भुकूमला मात्र अधिकारी उशिराने उपस्थित

0
559

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यात सर्वत्र मतदान उत्साहात सुरू झाले आहे. भुकूम, ता.मुळशी येथील केंद्र क्रमांक 140 चे कक्ष स्तरीय अधिकारी सकाळी 9 वाजेपर्यंत उपस्थित न झाल्याने नागरीकांना अडचणींना सामोरे जावे लागले. तसेच येथे एक व्हीव्हीपॅट मशिन बंद पडल्याने गोंधळ उडाला होता. ते बदलून मतदान पुन्हा सुरू करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

          भोर विधानसभा निवडणुकीसाठी भोर, वेल्हा आणि मुळशी तालुक्यात मतदान होत आहे. मतदानाची तीनही तालुक्यात जय्यत तयारी करण्यात आली आहे. पावसाच्या पार्श्वभुमीवर कर्मचार्यांनी मोठ्या अडचणींचा सामना करत आपापले मतदान केंद्र मतदान साहित्या समवेत गाठले आहे. पावसाचे सावट असलेल्या मतदानाला लोकं कशी आणि किती उपस्थिती लावतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

           मात्र अशातच काही कर्मचार्यांकडून मात्र कामात थोडासाही चुकारपणा झाला तरी त्याचा निवडणुकीवर मोठा परिणाम दिसून येऊ शकतो. त्यामुळे प्रशासकीय पातळीवर या सर्व कामकाजावर बारीक लक्ष ठेवून मतदान सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

          203 भोर विधानसभेसाठी निवडणुक पार पडत असताना भुकूम केंद्र क्रमांक 140 चे कक्ष स्तरीय अधिकारी अनिल भिमराव बोराटे हे आज मतदान केंद्रात वेळेत न पोहोचल्याने नागरीकांना मतदान यादीत नाव शोधणे अवघड जात होते. त्यांचा भ्रमणध्वनि देखील बंद लागत असल्याचे नागरीकांनी सांगितले. त्यामुळे याबाबत कारवाई होणे गरजेचे आहे. तसेच नेमके भुकूम मधील एका केंद्रात एक व्हीव्हीपॅट मशिन बंद पडले होते. त्यामुळे मतदान काही काळ बंद ठेवावे लागले. मात्र नंतर ते बदलून दुसरे ठेवल्याने मतदान सुरळीत सुरू झाले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here