जनतेच्या हित न जपणार्‍या सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही – शरद पवार

0
712

ग्रामीण भागाच्या अविरत विकासासाठी थोपटेंना निवडून देण्याचे शरद पवार यांनी केले आवाहन

स्वराज्यनामा ऑनलाईन  : जे सरकार जनतेच्या हिताची जपणूक करत नाही त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नसल्याचे शरद पवार यांनी भोर येथील जनतेला उद्देषून सांगितले. भोर विधानसभेचे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांच्या प्रचारानिमित्त आज भोर येथील हरिश्चंद्री (कापूरव्होळ) येथे सभा होणार होती. मात्र पावसाळी वातावरणामुळे हेलिकॉप्टरची उड्डाणं रद्द झाल्याने त्यांना इच्छा असुनही सभेला वेळेत पोहोचता येत नसल्याने ते येऊ शकले नाहीत. त्यांनी तंत्रज्ञानाचा फायदा घेत भ्रमणध्वनीवर उपस्थितांना संबोधन केले.

            यावेळी झालेल्या सभेस माजी मंत्री अनंतराव थोपटे, माजी खासदार नाना नवले, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सविता दगडे, मुळशी सभापती राधिका कोंढरे, विक्रम खुटवड, सुनिल चांदेरे, महादेव कोंढरे, शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, गंगाराम मातेरे, राहुल जाधव आणि भोर-वेल्हे-मुळशीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक दिग्गज पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शरद पवार साहेब हे भोरच्या सभेस उद्देषून भ्रमणध्वनीवर बोलत असताना तो आमदार संग्राम यांनी माईकपाशी धरून ठेवला होता.

भोर येथे उपस्थित राहू न शकल्याने शरद पवार साहेब यांनी मोबाईलवरच उपस्थितांशी संवाद साधला.

Posted by स्वराज्यनामा on Saturday, 19 October 2019

             पवार साहेब पुढे म्हणाले की, 5 वर्षात शेती, शेतकरी, कष्टकरी, कामगार, मजूर, गरीब यांच्या कष्टाची सोडवणूक केली नाही, त्यामुळे सत्ताबदल आवश्यक आहे. कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे हे आमदार म्हणून उत्तम काम करत आहेत. ग्रामीण भागाच्या विकासाला खुप लक्ष दिलं आहे. हेच काम पुढे चालू ठेवायचं असेल तर संग्राम थोपटेंना मोठ्या मताधिक्क्याने विजयी करा असे आवाहनही केले.

             दरम्यान व्यासपीठावर अनेक मान्यवरांनी भाषमातून आपली मनोगते व्यक्त केली. थोपटे यांच्यासाठी भोर तालुका राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने एकवटली असून तीही या प्रचारात सक्रीय झालेली दिसून आली. मुळशी राष्ट्रवादीही मोठ्या जिद्दीने काम करत असून पवार साहेबांचे हात बशकट करण्यासाठी तीनही तालुक्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी मन लावून थोपटे यांच्या मोठ्या मताधिक्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे दिसत आहे. भरपावसातही नागरीकांची मोठी गर्दी सभेला झाली होती.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here