नानांना साथ द्या – माजी सभापती आशालता कलाटे यांची साद

0
947

स्वराज्यनामा ऑनलाईन :  भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार आत्माराम नाना कलाटे यांनी प्रचारामध्ये कोणताच कसर न ठेवता मतदारांपर्यंत प्रामाणिकपणे पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. कपबशीचा जोरदार प्रचार वेल्हे-भोर-मुळशी या तीनही तालुक्यात झाला. त्यांना उत्स्फुर्त प्रतिसाद आणि भरघोस पाठिंबाही मिळाला आहे. त्याच शिदोरीवर भोर विधानसभेत परिवर्तन होणार की नाही, हे पाहणे आता उत्सुक्याचे ठरले आहे.

            प्रचार शिगेला पोहोचला असताना मुळशीकर नागरीक नानांसाठी एकवटलेले दिसत आहेत. काहीजण उघड उघड आपल्या पक्षाच्या भुमिकेविरोधात जाऊन, कारवाईची पर्वा न करता मुळशीकर म्हणून नानांच्या पाठीशी उभे राहून प्रचारात सक्रीय आहेत. तर अनेक जणं उघड न येता मोठ्या प्रमाणावर नानांची बाजू उचलुण धरणार आहेत. नानांच्या विजयाचं गणित पक्कं झालं आहे, फक्त त्यावर शिक्कामोर्तब मारणं बाकी असल्याचं वातावरण सध्या मुळशी-भोर-वेल्ह्यातून नानांना अनुकूल झालेलं दिसत आहे.

    नाना चांगला माणूस, नानांना साथ द्या – आशालता कलाटे

            नाना म्हणजे चांगला माणूस आहे, त्यांना पटकन कोणाचा राग येणार नाही, ते कोणाला पटकन रागावणार नाहीत. ते पटकन कोणाला असे सुनावत देखील नाही की, तु असा आहे, तु तसा आहे. त्यांचा स्वभाव प्रेमळ असल्याने, त्यांना नक्कीच फायदा होईल. कोणाच्या मुलांची शाळेची फी, घरावर जप्ती, डी अडचणीला नानांनी मदत केली आहे. प्रसंगी स्वतःच्या अंगठ्या, दागदागिनेही गहाण ठेवायला मागे पुढे पाहिले नाही. त्यामुळे गोरगरिबांचा कैवारी आणि तळागाळात्या कार्यकर्त्यांना मदत करणारं व्यक्तिमत्वं म्हणजे नाना आहेत.

             बॅंकेच्या माध्यमातून लोकांना कर्ज देणे, महिला बचत गटांना कर्ज देणे मग त्यामध्ये गायी, म्हशी, गोठा अशी नानाविध कारणं असतील त्याला त्यांनी सहाय्य केले आहे. पॉलिहाऊस उभारायलाही अनेकांना मदत केली आहे. नाना म्हणजे आपल्या तालुक्याचा उमेदवार असून तालुक्याची जी आज परिस्थिती आहे, ती ढासळली असल्याने तिला बदलण्यासाठी नानांना तालुक्याने साथ द्यावी. तालुक्याला नेता नाही, तो नेता निवडून द्यायचा आहे. त्यामुळे नानांना दिलेली मोलाची साथ ती गोष्ट साध्य करू शकते, असे मत नानांच्या पत्नी माजी सभापती आशालता कलाटे यांनी व्यक्त केली आहे.

आत्माराम नाना कलाटे यांचा अल्प परिचय

1.वयाच्या 23 व्या वर्षी 1978 साली वाकड गावचे सरपंच

2. 1992 साली जिल्हा परिषद निवडणुकीत नव्या कोळवण-वाकड गटात कॉंग्रेसकडून विजयी

3. 1995 साली प्रेरणा नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालकपदावरून अध्यक्षपदावर प्रवास

4. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेवर उपाध्यक्ष पदावर काम करताना शेतकरी, महिला, तरूण, उद्योजक यांना मोलाची मदत

5. 1997 साली वाकड गणांतून पत्नी आशालता कलाटे ह्या विजयी.

6. सौ.आशालता कलाटे महिला स्वयंसहाय्यता बचत गट पतसंस्थेची स्थापना

7. गावोगावी केटीवेअर बंधारे, रस्ते, वाड्या-वस्त्यांवर पाणी, महिला सबलीकरण याबाबत स्वराज्य निर्माण करण्याची दुरदृष्टी आणि कृती

आत्माराम नाना कलाटेंच्या वचननाम्यातील काही महत्वाच्या तरतुदी

1. मतदारसंघात कृषि महाविद्यालय स्थापन करून शेतीला बळ द्यायचं आहे.

2. स्थानिकांना रोजगारासह प्रत्येकाला काम द्यायचा नवा संकल्प.

3. शेती आणि शेतीचा संपुर्ण विकास, हाच एकमेव ध्यास.

4. गडकिल्ल्यांचं रक्षण, संवर्धन आणि विकास हे पहिलं पाऊल असणार.

5. पुणे-बंगळूर राष्ट्रिय महामार्गाचे प्रलंबित काम पुर्ण करणार.

6. भोर-वेल्हा-मुळशीला स्वयंपुर्ण करणार.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here