शिक्षकाची आर्थिक व्यवहारात फसवणूक करणार्‍याला राजगड पोलिसांच्या बेड्या

0
466

स्वराज्यनामा ऑनलाईन –  

कापूरहोळ (प्रतिनिधी)  :  विश्वास संपादन करून शिक्षकाची जमिन व्यवहारात 19 लाख रूपयांची फसवणूक केलेल्या आरोपीस राजगड पोलिसांनी अटक केली आहे. सुरेश धोंडीबा शिंदे (रा. खरीव, ता. वेल्हा, जि.पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून तो इस्टेट एजंट म्हणून काम करतो.

               याबाबत सविस्तर माहिती अशी की, वेल्हे तालुक्यातील शिक्षक विठ्ठल पवार आणि आरोपी सुरेश धोंडिबा शिंदे यांची काही वर्षापुर्वी ओळख झाली. शिंदे याने पवार यांचा विश्वास संपादन करत वेल्हे तालुक्यात स्वतःची जमिन आहे असे दाखवून देऊन लवकरच आपण एक शिक्षण संस्था उभारणार असल्याची बतावणी केली. त्यासाठी तुम्ही जमिनीमध्ये पैसे गुंतवा, जमिन कमी पैशात मिळेल आणि तुम्हाला फायदा होईल असा आग्रह धरला. त्याच्या सांगण्यावर विश्वास बसल्याने विठ्ठल पवार व त्यांचे आई वडील यांनी रोख स्वरूपात 19 लाख रूपये वेळोवेळी मिळून दिले. विश्वास बसण्यासाठी शिंदे यांना वेल्हे येथील 2 एकरची जागा आणि 7/12 उतारेही त्यावेळी दाखवले होते.

               मात्र तद्नंतर पवार यांना खरेदीखत करून देण्यास शिंदे वारंवार टाळू लागला. खूप तगाद्यानंतरही शिंदेवर संशय आल्याने पवार यांनी सखोल चौकशी केली असता शिंदेची जमिन वेल्हे तालुक्यात आंबवणे येथे नसल्याची माहिती उजेडात आली. त्यानंतर याचा जाब पवार यांनी विचारल्या नंतर घेतलेले 19 लाख रूपये हात उसने असे दाखवून 7 मे 2019 रोजी नसरापूर, ता.भोर येथे शिंदे याने एक करारनामा लिहून दिला. त्यानुसार दोन महिन्यात सर्व पैसे परत करण्याचे त्याने वचन दिले होते. पण तसे काहीच न झाल्याने विठ्ठल पवार यांनी राजगड पोलिस स्टेशनला आर्थिक फसवणूकीची तक्रार अर्जाद्वारे फिर्याद दिली.

               त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये सुरेश धोंडिबा शिंदे याला आर्थिक फसवणूकीखाली दिनांक 13 ऑक्टोबर 2019 रोजी अटक केली आहे. भोर येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी कोर्टामध्ये हजर केले असून या गुन्ह्याचा तपास राजगड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुधीर होळकर हे करत आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here