मारूंजीत थोपटेंना विजयी फेटा आणि मिरवणूकीची अनुभूती

0
1189

मारुंजी, ता.मुळशी येथे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे यांना फेटा घालून मिरवणूक काढण्यात आली.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  मारूंजी, ता.मुळशी येथे संग्राम थोपटे यांना फेटा बांधून त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जणू काही विजयी मिरवणूकच असल्याची नागरीकांनी थोपटे यांना प्रचिती आणून दिली. आयटीनगरी माण-हिंजवडी परिसरात थोपटे यांचा रविवारी दौरा होता.

             यावेळी शिवाजी बुचडे, दादाराम जगताप, युवराजनाना हुलावळे,  हिरामण बुचडे, सुरेश निकाळजे, गणपत जगताप, बाळासाहेब बुचडे, कृष्णा बुचडे, आकाश बुचडे, सुखलाल महाराज बुचडे, सुरेश मुरकुटे, विविध पदाधिकारी आणि ग्रामस्थं उपस्थित होते. मारूंजी परिसरातील जुण्या जाणत्या अशा ज्येष्ठ लोकांनी कॉंग्रेस पक्षाला मोठा पाठिंबा दर्शवला.

             यावेळी बोलताना थोपटे म्हणाले की, विरोधी उमेदवारांकडून सोशल मिडीयावर मुळशीची अस्मिता जागवण्याचा दिखावा केला जात आहे. हा नसता प्रांतवाद दुसरे काहीच मुद्दे नसल्याने रेटला जात आहे. मात्र जेव्हा मुळशीचे राजाभाऊ हगवणे हे विधानसभा निवडणूकीस उभे असताना मात्र बाहेरच्या उमेदवाराचा प्रचार केला, तेव्हा मात्र मुळशीची अस्मिता नाही आठवली.

             याउलट मी भोर आणि वेल्ह्यापेक्षा किंचीत अधिक कामे मुळशी तालुक्यात केली आहे. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता आला तरी मी त्याला काही ना काही विकासकाम वा गरजूंना शासनाचं आर्थिक सहाय्य मिळवून दिलं आहे. माझं काम मुळशीतल्या एकुण एक गावात काही ना काही स्वरूपात पोहोचलं आहे. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन व विचारात अग्रभागी ठेवून कारभार करत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मुळशीतील विकासकामं करण्याची संधी द्याल असे म्हणून थोपटे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

मारुंजी, ता.मुळशी येथे आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे उपस्थित ग्रामस्थांना संबोधित करताना.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here