सक्षम पर्याय म्हणून अपक्ष नाना कलाटेंचे भोरमध्ये उत्स्फुर्त स्वागत

0
1189

भोर तालुक्यात घरोघरी, गाव, वाड्या-वस्त्यांवर जाऊन आत्माराम नाना कलाटे यांनी प्रचार केला.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  निवडणुकीनंतर जनतेला वार्यावर सोडणार्या लोकप्रतिनिधींना जनता विसरत नसते. सद्य परिस्थितीत विधानसभा निवणूकीत प्रबळ दावेदार दोन्ही पक्षांच्या उमेदवारांना भोरची जनता पर्याय शोधत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एक सक्षम पर्याय म्हणून मुळशीतले कपबशी चिन्हावर निवडणूक लढवणारे अपक्ष उमेदवार आत्मारामनाना कलाटे यांचे भोरमधून उत्स्फुर्त स्वागत होऊन प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

              कलाटे यांनी आज भोरमधल्या वीस गाव खोर्‍यातील निलकंठ-गोकवडी, आंबाडे, बालवडी, नेरे, पाले, वरवडी खुर्द, वरवडी डायमुख, वरवडी बुद्रूक, पळसोशी, उदानखानवाडी, धावडी, मानकरवाडी, बाजारवाडी, हातनोशी, खानापूर, भाबवडी, भोर चौपाटी, भोर शहर, महुडे बु. आदि गावांमध्ये धुमधडाक्यात प्रचार केला. सर्वसामान्य जनतेने त्यांना उत्स्फुर्त पाठिंबा देत त्यांच्या विजयात वाटेकरी होण्याचं आशिर्वादरूपी वचनही दिलं.

              भोरमधील सर्वसामान्य जनतेला आता बदल हवा आहे. तेच ते लोकप्रतिनिधी येथे असल्याने विशेष असे काही घडताना दिसत नाही. जनता डोळ्यात तेल घालून लोकप्रतिनिधी बदलायची वाट पाहत आहे. कारण जनतेला आता विकासात्मक बदल झालेला पहायचा आहे. जनतेमध्ये प्रचंड रोष असून मुलभूत सेवा सुविधांचा झालेला अभाव भरून काढेल असा नव्या दमाचा लोकप्रतिनिधी हवा आहे. त्यासाठी कलाटे यांच्या कपबशीला मोठी पसंती भोर तालुक्यातून मिळत आहे. भोर आणि मुळशी तालुक्याने विचार केल्यास भोर विधानसभेमध्ये परिवर्तन अटळ आहे. भोर तालुक्यातून मागच्याच वेळचे उमेदवार रिंगणात उभे असल्याने त्यांच्याकडे मतदार पाठ फिरवण्याची शक्यता आहे. त्यामुळेचे नाना कलाटे हे भोर करांच्या आशा पल्लवीत करणारं नेतृत्व ठरण्याची शक्यता आहे.

              महुडे खुर्द, माळवाडी, ब्राम्हणघर ही.मा., नांद, शिंद, गवडी, नानाची वाडी, किवत, गणेश नगर, पसुरे, कर्नवडी, म्हाळवडी, बारे बु., बारे खुर्द, सरापूर, भोलावडे, कासुर्डी गु.मा., कामथडी, उंबरे या गावांमध्ये नाना घरोघरी फिरून मतदारांना कपबशीला मतदान करण्याचे आवाहन केले. शहराकरणामुळे मुळशीत जो विकास झाला आहे, त्यासारखा ग्रामीण जीवनाला कलाटणी देणारा आणि ग्रामीण जीवनाला रुचणारा असा विकास नक्कीच करू असे येथील जनतेला आश्वासन दिले आहे. परिवर्तनाची संधी येत असते, तिचा फायदा नाही घेतला तर आहे तेच दिवस भोगावे लागतात. त्यामुळे परिवर्तन करण्यासाठी नागरीकांनी उत्स्फुर्त मतदान करावे, अशी अपेक्षा कलाटे यांनी व्यक्त केली आहे.

व्हिडीओ पहा : भोर तालुक्यात पदयात्रा काढून अपक्ष उमेदवार आत्माराम नाना कलाटे यांनी प्रचार केला.

भोर विधानसभेचे अपक्ष उमेदवार नाना कलाटे कपबशीचा प्रचार भोर येथे करताना…

Posted by स्वराज्यनामा on Sunday, 13 October 2019
ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here