विकासकामांच्या जोरावर माण-हिंजवडी गटात थोपटेंना मिळणार आघाडी?

0
2361

माण गणात 18.78 कोटी व हिंजवडी गणात 14.22 कोटी अशी एकुण 33 कोटींची विकासकामं

स्वराज्यनामा ऑनलाईन  :  पुर्वापार पासून ते अगदी अलिकडच्या काही वर्षांपर्यंत कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या माण–हिंजवडी जिल्हा परिषद गटात रविवारी संग्राम थोपटे यांनी प्रचारानिमित्त दौरा केला. कॉंग्रेस पक्षाचा पारंपारिक मतदार या गटात मोठ्या प्रमाणावर असून 33 कोटींची केलेली विकासकामे ही संग्रामदादांना मोठे मताधिक्य मिळवून देणार आहे.

                माण– हिंजवडी जिल्हा परिषद गटात आज रविवारी प्रचार करताना रिहे येथे मुळशीचे उपसभापती पांडुरंग ओझरकर, सुरेश हुलावळे, शिवाजी बुचडे, दादाराम मांडेकर, शिवाजी जांभुळकर, गंगाराम मातेरे, बाळासाहेब सणस, हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे, माणचे माजी सरपंच संदिप साठे, सुनिल वाडकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश निकाळजे, आनंदा घोगरे, तात्यासाहेब देवकर, रमेश शेळके, बाळासाहेब गोडांबे, विठ्ठल गोडांबे, संतोष साखरे, सागर साखरे, दत्ता साखरे, प्रशांत रानवडे, दिग्विजय हुलावळे, राहुल जांभुळकर, विठ्ठल रानवडे, मल्हारी साखरे आदी मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी पक्षही यानिमित्ताने एकवटल्याने भरघोस मताधिक्क्याने विजयाची नांदी आता आघाडीला भोर मतदारसंघात दिसू लागली आहे.

                माण–हिंजवडी जिल्हा परिषद गट हा मोठा विचित्र भौगोलिक आणि आर्थिक फरक असलेला गट आहे. रिहे-आंधळे खोरं अतिशय दुर्गम आणि आर्थिकदृष्ट्या कमी सधन असलेल्या लोकांचे मोठे प्रमाण असलेला असा हा भाग आहे. मात्र बापुजीबुवा घाट ओलांडताच जागतिक पटलावरची माण–हिंजवडी आयटीनगरी हा समृद्ध असा आणि विकसित परिसर असून मारूंजी, नेरे, ताथवडे, जांबे असा विकसाच्या मार्गावर जोरदार वाटचाल करणारा परिसर आहे. त्यामुळे बापुजीबुवा घाटाच्या दोन्ही बाजुला विषमता आढळणारा असा हा जिल्हा परिषद गट आहे.

                सध्या राष्ट्रवादीचे प्राबल्य या गटात आहे. आघाडी होऊनही राष्ट्रवादीचे एक लोकप्रतिनिधी विरोधी अपक्ष उमेदवारासोबत फिरत असल्याने विविध चर्चा रंगवल्या जात आहेत. मात्र संग्राम थोपटे यांनी या माण पंचायत समिती गणात 18.78 कोटींची व हिंजवडी पंचायत समिती गणात 14.22 कोटींची अशी एकुण 33 कोटींची विकासकामं केली आहेत. ही थोपटे यांच्या पथ्यावर पडणारी एक जमेची बाजू आहे.

                कॉंग्रेस व राष्ट्रवादीची आणि मित्र पक्षांची आघाडी तसेच शरद पवार साहेबांना बळकटी देण्यासाठी सर्वसामान्य मतदार मात्र संग्राम थोपटे यांच्याच पारड्यात झुकते माप टाकणार असल्याची झलक माण–हिंजवडी थोपटे यांच्या दौर्यात पहायला मिळाली आहे. मुळशी तालुक्यात सर्वाधिक मतदान या जिल्हा परिषद गटात घेण्यासाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत. आणि त्यात ते यशस्वी होण्याची चिन्हं आहेत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here