यशस्वी उद्योजक राजेंद्र बांदल यांचा पुरस्काराने गौरव

0
588

स्वराज्यनामा ऑनलाईन : शून्यातून विश्‍व निर्माण करत गगनभरारी घेणार्‍या उद्योजक राजेंद्र बांदल यांना सकाळ समुहातर्फे गौरविण्यात आले. राजेंद्र बांदल हे मुळशी तालुक्यातील एक यशस्वी उद्योजक असून त्यांच्यापासून प्रेरणा घ्यावी अशीच त्यांची वाटचाल आहे.

               सकाळ समुहातर्फे विविध यशस्वी आणि गुणवंतांचा सत्कार समारंभ नुकताच पार पडला. यावेळी या सत्कारमुर्तींमध्ये राजेंद्र बांदल यांनाही सहकुटुंब गौरविण्यात आले. सकाळ समुहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते “सकाळ एक्सलंस” हा पुरस्कार बांदल यांनी सत्कार स्विकारला.

               अतिशय हलाखीत शालेय शिक्षण पदवीपर्यंत पुर्ण करून बँकेत अकाउंटंट असलेले बांदल हे स्वकष्टावर हिमालय नागरी पतसंस्थेची स्थापना करतात. आणि त्यात अथक परिश्रमाने त्याचा वटवृक्ष करतात. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवून केवळ 20 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली पेरिविंकल शाळा आज मात्र हिमालयासारखं रूप धारण करून 4 हजार विद्यार्थी व 300 शिक्षक अशी मोठी मजल पुर्ण केली आहे.

               रिअल ईस्टेट, फायनान्स रिकव्हरी, डेव्हलपर्स, कॅफे अँड रेस्टॉरंट, सिक्युरिटी फोर्स अशा अनेक उद्योगात प्रामाणिकतेने आणि सचोटीने मार्गक्रमण करणारे बांदल समाजपयोगी कामंही तितकीच अग्रभागाने करतात. 700 जणांना रोजार देणारे बांदल यांचा उचित गौरव सकाळ माध्यमाने केला असल्याची प्रतिक्रीया जनमाणसांत उमटली आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here