थोपटे उद्या मुळशीत, विकासकामांच्या पॅटर्नला मुळशीकर देणार प्रतिसाद?

0
1358

स्वराज्यनामा ऑनलाईन :  काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार संग्राम थोपटे उद्या मुळशी तालुक्यात प्रचाराची रणधुमाळी उठवणार आहेत. रिहे खोरं आणि पुर्व भागातील गावांना भेटी देणार असून थोपटेंचाही विकासात्मकतेचा वेगळा पॅटर्न यानिमित्ताने मुळशीकरांना पहायला मिळणार आहे.

           सलग 2 वेळा आमदार म्हणून निवडून आल्याने मुळशीकरांशी अत्यंत जवळचे संबंध आपल्या कामातून थोपटे यांनी दाखवून दिले आहे. प्रसिद्धीपासून दूर राहत विकासकामांना महत्व देत ती राबवणं अशा थोपटेंचा पॅर्टन मुळशीकरांना आवडलेला आहे. वाडी वस्त्यांवर त्यांच्या सर्वत्र नावानिशी पाठ आणि ओळख असलेले ग्रामस्थं, ही संग्राम थोपटे यांची मोठी जमेची बाजू आहे. मुळशीत असं कोणतही गाव नाही जिथं संग्राम दादांचं काम नाही, अशा मोठ्या जोशात काँग्रेसचे कार्यकर्ते थोपटेंचा प्रचार करतात.

           थोपटेंना भरघोस मतदान देऊन मुळशीत मोठे मताधिक्य देण्यासाठी एकदिलाची तयारी आणि सहभाग राष्ट्रवादीने राबवला असल्याने थोपटेंना यंदाची लढाई तशी एवढी अवघड नाही. फक्त मोठ्या मताधिक्यांचं ध्येय काँग्रेस आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी बांधलेलं दिसत आहे. काही जण उघड उघड विरोधी उमेदवारांसोत फिरत असले तरीही शरद पवार साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वसामान्य कार्यकर्ता आणि सर्वसामान्य नागरीक हे आघाडीलाच मतदान करणार असून पुन्हा एकदा भोर विधानसभेवर संग्राम थोपटे निवडून जाणार, हे उघड्या डोळ्यांनी दिसू लागलं आहे.

           सकाळच्या सत्रात आघाडीचा प्रचारदौरा आंधळे, कातरखडक, खांबोली, पिंपळोली, जवळगाव, केमसेवाडी, पडळघरवाडी, रिहे, घोटवडे या गावात, वाडीवस्त्यात होणार आहे. तर दुपारच्या सत्रात भोईरवाडी, माण, हिंजवडी, मारूंजी, नेरे हा आयटीचा परिसर तसेच कासारसाई, जांबे, ताथवडे, म्हाळुंगे, सुस येथे प्रचाराचा उद्याचा शेवट होणार आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here