भक्ती-शक्ती संगमाने संस्कृतीची निर्मिती, वारकरी मेळाव्यात विचार प्रकटन

0
703

शिवशंभो लॉन्स-माळेगाव, नसरापुर (ता. भोर) येथे ह.भ.प. ढोक महाराजांचे आशिर्वाद घेताना आमदार संग्राम थोपटे.

स्वराज्यनामा ऑनलाईन :  भक्ति आणि शक्तीचा जिथं संगम होतो तिथं संस्कृती तयार होते. ती जपणे आजच्या जीवनात महत्वाचे आहे. असे मत वारकरी मेळाव्यात व्यक्त करण्यात आले. शिवशंभो लॉन्स, (माळेगाव, नसरापुर) ता. भोर या ठिकाणी समस्त भोर वेल्हा व मुळशी तालुक्यातील वारकरी, टाळकरी,  वादक, कीर्तनकार, प्रवचनकार व वारकरी सांप्रदायाशी निगडीत सर्व मंडळीचा मेळावा पार पडला.

             वारकरी संप्रदायातील सर्व वैष्णवांचा मेळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सर्व मंडळी मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी शिक्षण संस्थेचे प्रमुख अध्यापक, केंद्र शासनाचा शांतिब्रम्ह पुरस्कार जाहीर झालेले प.पु.गुरुवर्य मारोती बाबा कुरहेकर व लक्ष्मण महाराज यादलापूरकर यांचा गुरुपूजन सोहळा पार पडला.

            या मेळाव्यास आमदार संग्रामदादा थोपटे यांची या ठिकाणी प्रमुख उपस्थिति होती. प्रसिद्ध रामायणकार आणि कीर्तनकार ह.भ.प. रामरावजी महाराज ढोक यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले. ढोक महाराजांचे थोपटे यांनी आशिर्वाद घेतले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here