शेतकऱ्याच्या मुलानेही आमदार व्हावे, यासाठी भोर विधानसभेत अनिल मातेरे लढणार

0
2923

स्वराज्यनामा ऑनलाईन :  व्यक्तिविशेष

              आमदाराच्या मुलाने आमदार व्हावे, शेतकऱ्याच्याच मुलाने शेतकरी व्हावे असे काही लिहून ठेवले नाही. तर शेतकऱ्याच्या मुलाने आमदार व्हावे आणि सर्वप्रथम शेतकरी, मजूर, कामगार यांच्या समस्या सोडवाव्यात, असे का नाही होऊ शकत. त्यासाठी सर्व शेतकरी बंधूंनी जागं झालं पाहिजे. शेतकरी कोण आहे त्यालाच मतदान करताना निवडून दिलं पाहिजे. यासाठीच मुळशीतून अनिल प्रकाश मातेरे मोठ्या जिद्दीतून मुळशी-भोर-वेल्ह्याचा समावेश असलेल्या भोर विधानसभा मतदारंघातून निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत. तरूंणाची, शेतकर्यांची ताकद काय असते हे प्रस्थापितांना आपल्या उमेदवारीने दाखवून देण्याची मोठी धमक अनिल मातेरे यांनी निर्माण केली आहे.

              अवघ्या 27 वयाच्या अनिलला कोणतंही राजकीय वलय नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी तालुकाध्यक्ष पदावर सध्या कार्यरत आहे. मा.राज ठाकरे साहेबांचे रोखठोक विचार एवढीच काय ती शिदोरी त्याच्या गाठीशी असलेली दिसते. अनिल हा सर्वसाधारण तरूण व्यवस्थेला आणि प्रस्थापितांना आवाहन करत मार्ग काढताना दिसतो आहे. या मार्गामध्ये लोकांनी त्याची साथ द्यावी आणि आपला राग प्रस्थापितांवर काढायची संधी साधून घ्यावी. कारण प्रस्थापित लोकप्रतिनिधी पाहिले तर कोणतेच कष्ट घेताना दिसत नाहीत. मुळ प्रश्नांवरच 70 वर्षे देश अजुनही निवडणुका लढवतो आहे. हे बदलायचं असेल तर प्रस्थापित घरी बसून कष्टाची तयारी असलेले नवोदित आपल्याला निवडून आणावे लागतील, हेच तर अनिल मातेरे यांच्या कृतीतून आणि विचारातून दिसते आहे.

              70 वर्षात परिस्थिती का बदलली नाही, याचा विचार होणे आता फारच गरजेचे आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गोष्टि अजुनही भारतीय नागरिकाला नीट मिळत नाही. आजही निवडणुका रस्ते, वीज, पाणी या गोष्टिंवरच लढवल्या जातात, याची राजकीय लोकांना लाजही वाटत नाही. मुळशी तालुक्यात तुम्ही रहात असाल तर तुम्हाला मणक्याचे, पाठ व कंबरदुखीचे आजार नक्कीच झाले असतील इतकी भयंकर अवस्था इथल्या रस्त्यांची आहे. भोर आणि वेल्हे तालुक्यातही अशीच बिकट अवस्था रस्त्यांची झालेली पहायला मिळते.

              आणि तरीसुद्धा प्रस्थापित लोकप्रतिनिधींना निवडून आणून ईथली जनता डोक्यावर बसवणार असेल, तर मग समजून जा तुम्ही अजुनही गुलामगिरीतच आहात. तेव्हा इंग्रजांच्या होता आणि आता इथल्या राजकीय व्यवस्थेच्या. दिल्लीसारख्या शहरात दोन्ही राष्ट्रीय पक्ष अर्थात कॉंग्रेस आणि भाजप यांना घरी बसावे लागते. सर्वसामान्य असलेले केजरीवाल मुख्यमंत्री बनतात. 26 वषार्ची पत्रकार असलेली एक सर्वसाधारण तरूणी काही महिन्यातच दिल्लीची मंत्री बनते, कारण तिथली जनता जागृत झालेली असते म्हणूनच हे घडते. असे आपल्या महाराष्ट्रात होताना दिसत नाही.

              मा.राज ठाकरे मोठ्या हिंमतीने प्रस्थापितांचे आणि सत्ताधार्यांचे कारनामे उघड करतात, तरी जनता मात्र डोळे झाकून जे नकोत त्यांनाच निवडून देते. मग तुमच्या भागात विकास कसा होईल, हे जनतेनेच ठरवावे. जर लोकसभेत प्रस्थापितांना धक्का दिला असता तर मुळशीच काय तर अख्ख्या महाराष्ट्रातले रस्ते आता चकाचक झालेले दिसले असते. पण तसे न झाल्याने हे कारभारी मात्र जनतेला गृहीत धरून गुलामांसारखं वागवत आहे. हळूहळू धार्मिक आणि ईव्हेंट करता येतील असे विषयांची ढाल करून विकासात अपयशी झाल्यांची गोष्ट लपवत आहे.

            सत्ताधारी आणि विरोधक दोघेही एकाच माळेचे मणी आहे. याउलट नव्या दमाचा, कोणाही राजकीय दुटप्पी विचाराला न बांधलेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मात्र अवघ्या महाराष्ट्राचं आशास्थान आहे. जोपर्यंत मनसे महाराष्ट्रात आहे, तोपर्यंत मराठी माणसाच्या असण्याला महाराष्ट्रात किंमत आहे. अन्यथा गुजराती लोकं आणि ईतर लोकं महाराष्ट्राची महत्वाची स्थानं, पदं, जबाबदार्या हस्तगत करायला लागल्या आहेत. त्यामुळे आता सावध होऊन महाराष्ट्र धर्मासाठी या बड्या पक्षांना बाजूला सारत नवनिर्माणाची लाट उभी केली पाहिजे. या लाटेत प्रस्थापित वाहून जाऊन विकासाची नवी सोनेरी पहाट उगवलेली या महाराष्ट्राला दिसलीच पाहिजे.

              अनिल प्रकाश मातेरे हा युवक काही आमदाराचा मुलगा नाही, कलेक्टरचा मुलगा नाही. तो तुमच्या आमच्या सारख् सर्वसामान्य शेतकर्याचा मुलगा आहे. त्याला निवडून दिल्यावर तो काही स्वतःच्या कंपन्या, संस्था काढेल असे नाही. उलट ज्यांनी असे केले असेल त्यांन जनतेने आता घरी बसवले पाहिजे. कोणताही लोकप्रतिनिधी असो, तो जर आपले काम चोख बजावण्यात अपयशी ठरल्यास त्याला घरचा पत्ता दाखवला पाहिजे. आणि कोणी विकासनिधी आणला म्हणजे तो जनतेवर उपकार करत नसतो, हे त्याचेच काम असते. पण हे काम त्याने किती तत्पर केले, कधी केले, कसे केले याचेही परिक्षण जनतेने केले पाहिजे. हे परिक्षणच सांगेल की त्या प्रस्थापिताला घरी बसवायची वेळ आली आहे.

तरूण युवा कार्यकर्ता :  मुळशी भोर वेल्ह्याचा तारणहर्ता

              अनिल मातेरे हा युवक तसा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता. मात्र मुळशीत कोणतंही काम असूद्या त्यात सहभागी होणारा हा धडाडीचा कार्यकर्ता आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या असो, यात पीएमपीएमएल असेल किंवा अगदी सरकारी दाखले मिळणे असेल यामध्ये पक्षाच्यावतीने प्रयत्न केले आहेत. प्रशासनाला विद्यार्थ्यांना लागणारे दाखले वेळेत मिळवून द्यायला भाग पाडले आहे. रस्त्यांच्या समस्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि त्यांच्या माध्यमातून अनिल प्रकाश मातेरे हा तरूण तितकाच सक्रीय राहिला आहे. मुळशीतीलच नव्हे तर वेल्हे आणि भोरमधील तरूणांचा एक आवाज अनिल याच्या रुपाने पुढे येत असून हजारो तरूण त्याच्यामागे येऊन एक भरभक्कम आव्हान प्रतिस्पर्ध्यांपुढे करतील याची खात्री आहे.

              गेल्या 10 वर्षात भोर विधानसभा मतदार संघात जे झालं नाही ते करून दाखवायचं आहे. रस्ते, वीज, पाणी या मुलभूत गोष्टिंबरोबरच शिक्षण, रोजगार, परिसरातच शेतकरी माल विकला जाईल यासाठी मार्केट, वैद्यकीय सुविधा यासाठी तन-मन लावून काम करायचे आहे, असा निर्धार केल्याचे मातेरे यांनी सांगितले आहे. भोर व वेल्ह्याला मागासलेपण घालवता येईल, त्यासाठी मा.राजसाहेब ठाकरे तसेच मा.अमितजी ठाकरे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभणार असल्याचे मातेरे यांचे म्हणणे आहे.

              परिवर्तन म्हणजे केवळ लोकप्रतिनिधी बदल नव्हे तर त्याबरोबरच परिसराचा विकास आणि त्यातील लोकांचा आर्थिक स्तर वाढून जीवनशैली उंचावणे असे परिवर्तन करून भोर-वेल्हा-मुळशी अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटेल असा घडवायचा आहे. मा.राजसाहेब ठाकरे यांचे हात मातेरे यांच्या पाठीशी असतीलच, पण खर्या अर्थाने समस्त शेतकरी बंधू, कामगार, मजूर वर्गानेही एका सर्वसामान्य, शेतकरीपुत्राला आता निवडून द्यावे, ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ती सत्यात उतरवली पाहिजे. जय भवानी! जय शिवराय!! धन्यवाद!!!

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here