देशभरातील सीए विद्यार्थ्यांचे आयसीएआय विरोधात आंदोलन

0
560

स्वराज्यनामा ऑनलाईन :  उत्तरपत्रिकांचे पुनःर्मुल्यांकन करावे या मागणीसाठी चार्टर्ड अकाऊंटंट विद्यार्थ्यांनी आयसीएआय संस्थेच्या पुणे कार्यालयाबाहेब शांतपणे निदर्शने केली. गेले 4 दिवस पुर्ण भारतात जवळपास 12 लाख विद्यार्थ्यांनी हे आंदोलन छेडले असून दिल्ली येथेही जोरदार निषेध व्यक्त करत आयसीएआय विरोधात आंदोनल छेडले आहे.

          सीए विद्यार्थ्यांची शिखर संस्था असणाऱ्या दिल्ली येथील द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) च्या मुख्य कार्यालयासमोर मागील तीन-चार दिवसांपासून विद्यार्थी आणि अनेक सीए यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे. त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून या संस्थेच्या पुणे येथील शाखा कार्यलयासमोर काल विद्यार्थी आणि सीए यांनी शांततेत निदर्शने केली.

          संस्थेचा मनमानी कारभार, चुकीच्या पद्धतीने उत्तर पत्रिकेची होणारी तपासणी, विद्यार्थी बरोबर उत्तर लिहिले असताना गुण न देणे, ओएमआर उत्तर पत्रिका तसेच उत्तर तालिका जाहीर न करणे, विद्यार्थ्यांच्या अनेक शंकांचे निरसन कित्येक महिने न करणे, मध्यवर्ती ठिकाणी उत्तरपत्रिका तपासणी सुविधा यासारख्या अनेक मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु आहे.

        याबाबत काल पुणे पोलिसांकडे शांततेत आंदोलन करण्यासाठी विद्यार्थी व सीए यांनी परवानगी पत्र मागितले होते परंतु आचारसंहिता असल्याने बिबवेवाडी पोलिसांनी सदर आंदोलनाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे हे आंदोलन सीए क्लास होणाऱ्या शुक्रवार पेठेमधील प्रेस्टीज पॉईंट या बिल्डिंग मध्ये होणार असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

राहूल गांधी यांनी ट्विट करून दिला पाठिंबा

       राहूल गांधी यांनी या 12 लाख विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला असून विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकांच्या पुनःर्तपासणीची केलेली मागणी न्याय्य असून सर्व राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा अशी पोस्ट त्यांच्या ट्विटर अकाउंटला केली आहे. दरम्यान केंद्र सरकार यात हस्तक्षेप करून विद्यार्थ्यांची मागणी पुर्ण करणार का, हे आता पहावे लागेल.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here