बारा फुटी अजगर पौडमध्ये पकडून ताम्हिणी अभयारण्यात सोडला

0
1295

स्वराज्यनामा ऑनलाईन : पौड, ता.मुळशी येथे मंगळवारी रात्री झालेल्या पावसामध्ये बारा फुटी अजगर वाहून आला होता. जिल्हा परिषद शाळेजवळच हा अजगर फिरत असल्याचे आढळले. येथील सर्पमित्र रविंद्र गुरव आणि मंगेश गुरव यांनी या अजगरला पकडून ताम्हिणी येथील अभयारण्यात सोडून देण्यात आले.
मंगळवारी पौड परिसरात अधूनमधून मोठा पाऊस पडत होता. जिल्हा परिषद शाळेसमोरूनच मोठा ओढा वाहत आहे. राञीच्या दरम्यान या ओढ्यातून वाहून बारा फुटी अजगर आला होता. हा अजगर ओढ्याजवळील तिकोणे आणि हेजिफ यांच्या घरापुढे फिरत होता. ही बाब नागरिकांनी पौड येथील सर्पमित्र रविद्र गुरव आणि मंगेश गुरव यांना कळविले. रात्री दहाच्या दरम्यान या अजगराला पकडण्यात यश आले.
पकडण्यात आलेला अजगर दुसऱ्या दिवशी ताम्हिणी येथील अभयारण्यात सोडून देण्यात आला. यावेळी दिलीप गुरव, बाळासाहेब इप्ते, अरविंद कांबळे, चेतन राऊत, सोमेश राऊत, सनी राऊत, नागेश तांबेकर, शुभम भोसले, अमजद मुलाणी, नौशाद आत्तार, विराज गुजराथी, संजय धानके हे उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here