अंबडवेटच्या हनुमान तरूण मंडळाकडून पुरग्रस्तांसासाठी मदतनिधी सुपुर्द

0
502

स्वराज्यनामा ऑनलाईन : कोल्हापूर-सांगली पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस हनुमान तरूण मंडळ, अंबडवेट, ता.मुळशी यांनी 30 हजार रूपयांचा धनादेश सुपुर्द केला आहे. कोल्हापूर, सांगली भागात पुराने हाहाकार माजवला आणि अतोनात नुकसान केले. त्यांच्या मदतीसाठी अंबडवेट गावांतील ग्रामस्थांनी मदत गोळा केली होती, ती धनादेशाद्वारे देण्यात आली.

          अंबडवेट, ता.मुळशी हे आदर्शगाव म्हणून जिल्ह्यात सर्वत्र परिचित आहे. गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत हा मदतनिधी गोळा केला. जिल्हाधिकारी कायार्लय, पुणे येथे मदतनिधीचा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचा धनादेश देण्यात आला आहे. पौड पोलिस निरिक्षक अशोक धुमाळ यांनी ग्रामस्थांचे कौतुक केले. तहसिलदार अभय चव्हाण यांनी हा मदतनिधीचा धनादेश जिल्हाधिकारी कार्यालयात जमा करावा असे सांगितले होते.

          यावेळी अंबडवेट ग्रामस्थं, माजी आदर्श जिल्हा परिषद सदस्य सुभाष अमराळे, ज्येष्ठ नेते प्रभाकर नागरे, शिवसेना नेत्या स्वाती ढमाले, हनुमान तरूण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश ढमाले, खजिनदार विजय नागरे, बाळासाहेब ढमाले, पोलिस पाटील अशोक नागरे, ग्रामपंचायत सदस्य आनंद ढमाले, नितिन ढमाले, प्रकाश नागरे, पीडीसीसी अधिकारी सुरेश नागरे, मा.उपसरपंच निलेश ढमाले, दत्तात्रय ढमाले, बाळासाहेब वरखडे, प्रशांत नागरे, भिवराम नागरे, शांताराम ढमाले, महेश घारे, कैलास नागरे, संभाजी ढमाले, भरत केदारी, राजाभाऊ ढमाले, तानाजी ढमाले आदि ग्रामस्थं उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here