आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेत कुळे येथील शिवराय तरूण मंडळ प्रथम

0
342

स्वराज्यनामा ऑनलाईन : आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या वतीने आयोजित मुळशी तालुका आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ पार पडला. कुळे येथील शिवराय तरूण मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला असून व्दितीय क्रमांक पौड येथील जय हनुमान तरूण मंडळ आणि तृतीय क्रमांक पिरंगुट येथील अखिल गोळे आळी मित्र मंडळाने मिळवला.

          मुळशी तालुक्यात दरवर्षी आबासाहेब शेळके मित्र मंडळ, पौड पोलिस स्टेशन आणि तहसिल कार्यालय मुळशी यांच्या संयुक्त विद्यमाने आदर्श गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन केले जाते तसेच या स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळासुध्दा भव्य स्वरूपात पार पडतो. मात्र यावेळी हा बक्षिस वितरण सोहळा पौड पोलिस स्टेशन येथे सांगली व कोल्हापूर येथे निर्माण झालेल्या पूराच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.

          यावेळी बोलताना पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ म्हणाले की, आबासाहेब शेळके मिञ मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेमुळे मुळशीत गणेशोत्सव काळात कुठेही शांतता भंग झाली नाही. तसेच मिरवणूका रात्री दहाच्या आतच संपल्या. यामुळे पोलिसांचे काम हलके होण्यास मदत झाली. नायब तहसिलदार भगवान पाटील म्हणाले की, प्रशासनाचे ८० टक्के काम आबासाहेब शेळके मित्र मंडळाच्या स्पर्धेमुळे कमी होऊन तालुक्यात गणेशोत्सव काळात कुठेही भांडण झाली नाही. मुळशीत शांततेत गणेशोत्सव पार पाडण्यासाठी आबासाहेब शेळके मित्र परिवाराचा मोठा वाटा आहे.

          पोलिस दलात उत्कृष्ट काम केल्याबद्दल नुकताच पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते पोलिस उपनिरीक्षक अनिल लवटे,पोलिस हवालदार शंकर नवले आणि पोलिस  नाईक संजय सुपे यांचा सन्मान करण्यात आल्याबद्दल आबासाहेब शेळके मिञ मंडळाच्या वतीने या तिघांचाही सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

          यावेळी पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, नायब तहसिलदार भगवान पाटील,  शिवसेना माजी तालुका प्रमुख प्रकाश भेगडे, आबासाहेब शेळके, पोलिस उपनिरीक्षक रेखा दुधभाते, माजी उपसरपंच कैलास मारणे, मुनीरभाई मुलाणी, सुरेश तिकोणे, दिपक सोनवणे, गोरख माझिरे, प्रविण सातव, निलेश कदम, महेश मोहोळ, नितेश दातीर, योगेश कोळवणकर, भाऊ आखाडे, मंदार पावसकर, उपस्थित होते. या स्पर्धेचे आयोजन शाकीर शेख, पोपट ववले, विनोद मारणे, सोमनाथ शिंदे, श्रीकांत क्षिरसागर यांनी केले होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here