मृणाल मारणे आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित

0
336
गणेश कला क्रिडा केंद्र(पुणे) येथे आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना बावधन शाळेच्या उपशिक्षीका मृणाल मारणे.

गणेश कला क्रिडा केंद्र(पुणे) येथे आदर्श शिक्षक पुरस्कार स्विकारताना बावधन शाळेच्या उपशिक्षीका मृणाल मारणे.

स्वराज्यनामा ऑनलाईन : बावधन, ता.मुळशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या उपशिक्षीका मृणाल मारणे यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, नवनाथ शिनलकर प्रविण माने, सुजाता पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

मारणे यांनी सन 2001 मध्ये शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले. आंबेगाव तालुक्यातील पेठ या गावातून मुलांना बौधिक ज्ञान तर दिलेच पण समाजाचा प्रामाणिक सच्चा नागरिक कसा असतो हे पण शिकवले. सन 2005 मध्ये मुळशीतील मारणेवाडीत येऊन सतत मुलांचा सर्वांगीण विकासाचा विचार केला. अविरत मुलांच्या प्रगतीसाठी प्रयत्न केले. त्यासाठी शैक्षणिक साहित्याचा वापर , ज्ञानरचना वाद याचा वापर केला. प्रगत तंत्रज्ञान वापरून मुलांची प्रगती केली. लेझीम कबड्डी स्पर्धांमध्ये सतत तालुका जिल्हास्तरावर बाजी मारुन कोणत्याही उपक्रमात पुढाकार घेऊन यशस्वीरित्या पार पाडले. याचीच दखल घेत मारणे यांना हा पुरस्कार देण्यात आला.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here