प्रसिद्ध तमाशा कलावंत, विनोद सम्राट आनंद ओव्हाळ-हाडशीकर कालवश

0
558

स्वराज्यनाम ऑनलाईन : हाडशी(ता. मुळशी) येथील महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध जेष्ठ लोककलावंत, तमाशा फडमालक, विनोदसम्राट आनंदा शिवराम ओव्हाळ – हाडशीकर ( वय.७७) यांचे वृद्धापकाळाने निधन झालेे. त्यांच्यामागे २ पत्नी, ४ मुले, ३ मुली, नातवंडे असा परिवार आहे.
ग्रामिण भागासाठी चालत आलेेेली मनोरंजन, लोक-कला अत्यंत खडतर परिस्थितीत अवगत करुन, ते टिकवायचे काम त्यांनी केले. संपुर्ण महाराष्ट्र भर फिरुन लोक-कलेच्या (तमाशा-फड) एकसंध उभा करुन कलेच्या माध्यमातुन समाज प्रबोधन-जनजागृती-विकृत पद्धतीला कसा आळा बसेल याचे काम त्यांनी केले.
प्रसिद्ध कलावंत लता पुणेकर, सुरेखा पुणेकर, रघुविर खेडकर यांचे ते गुरु होते. राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या विठाबाई नारायणगावकर, दादु इंदुरीकर, चंद्रकांत ढवळपुरीकर, दत्ता यांच्याबरोबर त्यांनी काम करुन अनेक तमाशाचे फड गाजविले. शिघ्रकवी शिवराम भिवाजी ओव्हाळ(मुळापुरकर) यांचे ते पुत्र होत.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here