कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी जीवनोपयोगी साहित्य केले गोळा

0
378
श्री स्वामी समर्थ पौड शाखेच्या सेवेकऱ्यांनी पूरग्रस्तांची जमा केलेले जीवनोपयोगी साहित्य

स्वराज्यनामा ऑनलाईन : श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित पौड (ता.मुळशी) शाखेच्या सेवेकऱ्यांनी गावोगाव फिरून कोल्हापूरच्या पूरग्रस्तांसाठी जीवनोपयोगी साहित्य गोळा केले.
यावर्षीच्या अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सातारा, सांगलीला पुराने वेढलेले होते. त्यामुळे या भागाची अपिरिमीत हानी झाली. पूरग्रस्तांना मदतीचा ओघ चालूच होता. पौडच्या दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ शाखेच्या सेवेकऱ्यांनी पौडगावात फिरून जीवनोपयोगी साहित्या गोळा केला. त्यामुळे गहू, तांदूळ, कडधान्य, नवे कपडे, स्वेटर, मसाल्याचे पदार्थ, औषधे आदि साहित्य गोळा करण्यात आले. या सर्व साहित्यांचे पॅकींग करून ते पूरग्रस्तांकडे पाठविण्यात आले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here