तहसिल कचेरीच्यावतीने पूरबाधित कुटूंबांना गहू, तांदूळ याचे वाटप

0
415

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातील अतिवृष्टीमुळे धरणाचे पाणी मुळा नदीत सोडण्यात आले होते. त्यामुळे मुळा नदीचे पाणी घरात शिरून नदीकिनारी वसलेली 121 घरे पुराच्या पाण्याने बाधित झाली होती. तहसिल कचेरीच्यावतीने बाधित कुटूंबांना गहू, तांदूळ याचे वाटप करण्यात आले.
यावर्षी तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडला. मुळशी धरण 93 टक्के भरल्यानंतर त्यातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हा विसर्ग समारे 45 हजार क्युसेक्स होता. त्यामुळे मुळा नदी दुथडी भरून वाहत होती. नदीचे पाणी दोन्ही बाजूला असलेल्या शेतात, घरात घुसले. पुराच्या पाण्यामुळे वाकड येथील 116, शेरे येथील चार आणि दारवली येथील एक असे एकूण 121 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. या घरातील कुटूंबांचे स्थलांतर करण्यात आले होते.
या सर्व कुटूंबाना महसूल विभागातील पुरवठा शाखेकडून प्रत्येकी दहा किलो गहू आणि तांदूळ देण्यात आला. शेरे आणि दारवलीतील कुटूंबाना पौड येथे धान्य वाटप करण्यात आले. तर वाकडच्या तलाठी कार्यालयातून या भागातील येथील बाधिताना धान्य दिले गेले. पौड येथे झालेल्या वाटप प्रसंगी पुरवठा निरीक्षक अश्विनी गायकवाड, गोदामपालक महेश गायकवाड, घरे बाधित झालेले राजेंद्र ढमाले, महादेव जाधव, शैला ढमाले, शांताराम ढमाले, बाळू थरकुडे हे शेतकरी कुटूंब त्याचप्रमाणे धान्य दुकानदार उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here