पौड येथील पोलिस हवालदार शंकर नवले यांचा सत्कार

0
414
पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते प्रशंसापञ स्वीकारताना पोलिस हवालदार शंकर नवले.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातील विविध ९ गुन्हेगारी टोळ्यांना मोक्का लावण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या पौड पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार शंकर नवले यांचा पोलिस अधिक्षक संदिप पाटील यांच्या हस्ते प्रशस्तिपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला आहे.
पोलिस हवालदार शंकर नवले यांनी पौड पोलिस स्टेशनला गेल्या साडेचार वर्षात कार्यरत असताना कुख्यात गजानन मारणे, मयूर गोळे, मंगेश जोरी, सुरज ढोकळे, शुभम गोळे, आप्पा गोगावले, भगवान मरगळे यांच्या टोळ्यांना मोक्काची कारवाई करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. या कालावधीत शंकर नवले यांनी अकरा टोळ्याविरोधात तत्कालीन पोलिस निरीक्षक यांच्या मार्फत मोक्काचे प्रस्ताव दाखल केले होते. त्यातील नऊ टोळ्यावर टप्याटप्याने मोकाची कारवाई झाली.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here