मुगावडे येथे गारटेक कंपनीने तुटलेला रस्ता केला दुरूस्त

0
381
मुगावडे (ता. मुळशी) : येथे तुटलेल्या रस्त्याची गारटेक कंपनीने दुरुस्ती केली आहे.

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुगावडे (ता. मुळशी) येथे जोरदार पावसामुळे रस्ता तुटला होता. गारटेक कंपनीने तुटलेला रस्ता दुरूस्त केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांची सोय झाली आहे. ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाचे आभार मानले आहे.
गेल्या काही दिवसांपासून मुळशी तालुक्यात सतत पाऊस सुरू आहे. अनेक रस्त्याची दुरावस्था झाली आहे. गेल्या काही दिवसापासून सतत पडत असलेल्या पावसाने मुगावडे गावातील रस्त्याचा काही भाग तुटल्याने मोठ्या गाड्या जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला होता. कंपनीने स्वखर्चातून हा तुटलेला रस्ता दुरूस्त केला आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांची सोय झाली आहे.
यावेळी उपसरपंच तानाजी वाळंज, माजी सरपंच गणेश मेंगडे, विकास खराडे, मंगेश कळमकर, बबन भेगडे, पप्पू वाकणकर, सचिन दुरकर, पोपट वाळंज उपस्थित होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here