मुळशीकर राष्ट्रीय क्रीडापटूंचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गौरव

0
561
सन्मानमूर्ती राष्ट्रीय खेळाडू वेदांत दुधाणे, आकांक्षा बुचडे, गीता मालुसरे

स्वराज्यनामा ऑनलाईन : मुळशी तालुक्यातील राष्ट्रीय खेळाडू आकांक्षा किसन बुचडे, वेदांत संजय दुधाणे, गीता महेश मालुसरे यांचा डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या वतीने गत वर्षांतील उज्ज्वल कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला आहे.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डाॅ शरद कुंटे यांच्या हस्ते आकांक्षा, वेदांत, गीताचा मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी अॅड. विद्याधर शिंत्रे, डाॅ. रोहिणी होनप आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रीय जलतलणपटू आकांक्षा किसन बुचडे हीने राष्ट्रीय जलतलण स्पर्धेत सुवर्णपदकाचा करिष्मा घडविल्याने तिचा सत्कार करण्यात आला. ती मारूंजी गावची सुवर्ण कन्या असून फर्ग्युसन महाविद्यालयात कला शाखेत शिकत आहे.
पिरंगुट गावातील वेदांत संजय दुधाणे याने मुंबई येथील राष्ट्रीय धर्नुविद्या स्पर्धेत रौप्य पदकाचा वेध घेतल्याने त्याचा सन्मान करण्यात आला. तो गोलवळकर विद्यालयात सातवी इयतेत शिकत आहे.
सागरी जलतलण स्पर्धेत सुवर्णपदकाचा पल्ला पार केल्याबद्दल गीता महेश मालुसरेचा गौरव करण्यात आला. जामगांवची ही सुवर्ण कन्या अहिल्यादेवी विद्यालयात दहावीत शिकत आहे.
आकांक्षासह वेदांत, गीता यांनी खेळाबरोबरच अभ्यासातही प्रगती केल्याने त्यांचा गौरव करण्यात आला असे सांगून डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे संचालक मिलिंद कांबळे म्हणाले की, या खेळाडूंच्या पाठिमागे संस्था कायम असेल.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here