पिरंगुटला महाराष्ट्र बॅंकेच्या ‘ आर्थिक साक्षरता ‘ मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
194
येथील महाराष्ट्र बॅंकेच्या आर्थिक साक्षरता मेळाव्यात मार्गदर्शन करताना बॅंकेचे कार्य़कारी संचालक हेमंत टम्टा. व्यासपिठावर उपस्थित मान्यवर.

स्वराज्यनामा ऑनलाईन : महिला बचतगट, शेतकरी व उद्योजकांना अर्थ सहाय्य करण्यात बॅंक आॅफ महाराष्ट्र अग्रेसर आहे. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या पेन्शन व विमा योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी बॅंकेत खाते उघडावे. जनधन खात्याचे परिपालन समाधानकारकपणे केल्यास दोन हजार
ते दहा हजार रुपयांपर्यंतचा ओव्हरड्राफ्ट सुविधेचा गरजेनुसार लाभ घेता येईल, असे आवाहन बॅंक आॅफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक हेमंत टम्टा यांनी केले.
पिरंगुट (ता.मुळशी) येथील महाराष्ट्र बॅंकेच्या आर्थिक साक्षरता मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना टम्टा बोलत होते. यावेळी बॅंकेच्या राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या मुख्य कार्यपालन अधिकारी आर. विमला, पुणे शहर क्षेत्रीय व्यवस्थापक व महाप्रबंधक प्रशांत खटावकर, महाप्रबंधक नित्यानंद देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी आर. विमला यांनी बॅंक आॅफ महाराष्ट्रने राज्यात व पुणे जिल्ह्यात बचत गटांना केलेल्या आर्थिक सहाय्याबाबत कौतुक केले त्या म्हणाल्या, ” महिलांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आर्थिक साक्षर बनले पाहिजे.
प्रशांत खटावकर म्हणाले, ” ग्राहकांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी बॅंकेत खाते उघडावे.”
यावेळी नित्यानंद देशपांडे यांनी कृषिविषयक व आर्थिक साक्षरताविषयक विविध योजनांची माहिती दिली. अभिनव काळे यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना आर्थीक साह्य करण्याच्या विविध योजनांची माहिती दिली. रोहन पानसरे यांनी किसान कार्ड तसेच कृषिविषयक योजनांची माहिती दिली.
सहाय्यक व्यवस्थापक डी.बी.देशमुख यांनी आर्थिक साक्षरता, जनधन खाते, सुरक्षा विमा, आयुर्विमा तसेच अटल पेन्शन योजनांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कोटीहून अधिक रकमेच्या पन्नास कर्ज मंजुरी पत्रकांचे वाटप करण्यात आले.
यावेळी स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र, बॅंक व्यवसाय, डिजिटल बॅंकिंग, वित्तीय साक्षरता, सावित्री महिला बचत गट उत्पादित वस्तुंची विक्री आदी स्टॅाल मांडण्यात आले होते. पुणे शहराचे जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक आनंद बेडेकर, लवळे शाखेचे व्यवस्थापक अक्षय लेंका व अन्य कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते. पी.एस. सरडे यांनी सूत्रसंचालन केले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here