घ्या पचनसंस्थेची काळजी

0
339

आपण जे खातो, ते अंगी लागले पाहिजे असे वाटत असेल, तर त्यासाठी योग्य आहार योग्य पद्धतीने पचला पाहिजे, असे घरातील आजी, मोठी माणसे सांगत असतात. कारण, आपण जे खातो ते नीट पचले, तरच शरीराचे पोषण होते. पोटाची काळजी घ्यायची असेल, तर भुकेपेक्षा दोन घास कमी अन्‍न खावे, असेही म्हटले जाते. आपण जे अन्‍न सेवन करतो, ते पचवण्याचे मुख्य काम पचनसंस्था करते. पचनसंस्था व्यवस्थित असेल, तर आहार पचून शरीरापर्यंत पोषणमूल्य पोहोचू शकते. थोडक्यात, पचनसंस्थेचे आरोग्य नीट, तर शरीराचे पोषण योग्य! त्यासाठी पचनसंस्था नीट राहण्यासाठी दैनंदिनीमध्ये काही गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत.

पचनसंस्थेची काळजी घेतली तर आरोग्य चांगले राहते. त्यामुळे त्यासाठी रोजच्या आयुष्यात काय गोष्टी त्यासाठी करता येतील, याचा विचार करू या. त्यात काही गोष्टी पूर्वीपासून आपण घरातल्या ज्येष्ठांकडून आपण ऐकल्या असतील किंवा त्या गोष्टी ते नियमाने पाळतही असतील कदाचित. कोणत्या या गोष्टी आहेत पाहू या.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here