नेहमी सर्वांना हसवणाऱ्या बिचुकलेंना अखेर रडू कोसळले

0
413

बिग बॉस मराठी -२ आता अंतिम फेरीत पोहोचले आहे. शेवटचे काही दिवस असल्याने या घरातील सदस्यापैकी कोणते पाच सदस्य ‘बिग बॉस’ ठरणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागून राहिले आहे. यासर्वातच सर्वांचे लक्ष वेधून घेणारे राजकीय नेते म्हणून ओळखले जाणारे अभिजीत बिचुकलेंना बिग बॉस मराठीने अलविदा केले. त्यावेळी सर्व सदस्य भावूक झाले. घराबाहेर जाण्यापूर्वी बिचुकलेंच्या नावाचा एक टास्क खेळण्यात आला होता. त्यावेळी नेहमी दंगा करणारे बिचुकले शांत होते. या सर्वातूनच बिचुकले घराबाहेर जाणार असल्याचे संकेत  बिग बॉसने दिले होते. 

विकेंडला स्पर्धकांना एक टास्क देण्यात आला होता. यामध्ये स्पर्धकाच्या नावाच्या सोनेरी पाटया लाकडी बॉक्समधून घरात आणल्या. ज्या स्पर्धकाच्या नावाची पाटी सिल्व्हर असेल त्या स्पर्धकाला बिग बॉसच्या घराला अलविदा करावे लागणार होते.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here