पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले मुळशीकर

0
372

पर्यावरण जनजागृती अभियाना अंतर्गत राज्यभर विविध उपक्रम राबविले जात असताना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,जवळ येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी ‘वृक्षबंधनाचा’ उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांनी शाळा परिसरातील झाडांना राख्या बांधून ‘पर्यावरण रक्षणाची’ शपथ घेतली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी निसर्ग रक्षणाच्या सामाजिक संदेशा सोबत च निसर्ग व पर्यावरण संवर्धनाचा विश्वास व्यक्त केलाय. 

यासाठी विद्यार्थ्यांनी टाकाऊ पासून टिकाऊ पण स्वनिर्मित राख्या तयार केल्या. शाळेच्या परिसरातील सर्व झाडांना राख्या बांधून त्यांच्या संरक्षणाची व संवर्धनाची जबाबदारी उचलली. शाळेचे उपक्रमशील शिक्षक किशोर बेलदार यांच्या मार्गदर्शनातून हा ‘नाविन्यपूर्ण पर्यावरण पूरक उपक्रम’ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात आणला. 

 शासनाच्या शतकोटी वृक्ष लागवड उपक्रमा अंतर्गत जुलै मध्ये शाळेत विविध प्रकारची झाडं लावून वृक्षारोपण करण्यात आले. आपण दरवर्षी वृक्षारोपण करतो. शाळेतील विद्यार्थ्यांनी या वर्षापासून ‘वृक्षबंधन’ उपक्रम राबवून वर्षभर झाडांची काळजी घेऊन, त्यांना संरक्षक जाळी बसवून,त्यांना वेळोवेळी खत-पाणी घालून त्यांची निगा राखून विविध प्राण्यां पासून त्यांचे संरक्षण करण्याचा निर्धार केला आहे.तसेच शाळेच्या कार्यक्षेत्रात व गावात कोणीही झाडं तोडू नये,झाडांचे नुकसान करू नये यासाठी  जनजागृती करून ख-या अर्थाने ‘वृक्षबंधन’ उपक्रम यशस्वी करण्याचे ठरवले आहे.

“आम्ही झाडं तोडणार नाही व कोणाला तोडू देणार नाही” “वृक्षबंधन व वृक्षसंगोपणाची सुरूवात स्वतः पासून करून गावात व परिसरात वृक्ष संगोपन चे महत्व पटवून देत पर्यावरण संवर्धन करू” असा निर्धार शाळेच्या हरित सेना विद्यार्थी प्रमुख सिध्देश संतोष घारे व विद्यार्थी प्रतिनिधी संजना सुपेकर यांनी केला. अशी माहिती जवळ शाळेचे उपक्रमशील शिक्षक किशोर बेलदार यांनी दिली. 

विद्यार्थ्यांच्या या नाविन्यपूर्ण, सामाजिक व निसर्ग-पर्यावरण संवर्धनास पुरक उपक्रमाचे शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थ यांच्या कडून सर्वत्र कौतुक होत  आहे. यासाठी शाळेचे मुख्याध्यापक जालिंदर चौधरी यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here