गायक आनंद शिंदे यांच्या गाडीला अपघात

0
405

प्रसिद्ध लोकगीतकार आनंद शिंदे यांच्या गाडीचा पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ अपघात झाल्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने या अपघातातून शिंदे थोडक्यात बचावले असून त्यांचा चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

आनंद शिंदे हे सोलापूर व पुढे  सांगोला कडे जाताना मंगळवारी  मध्यरात्री दोनच्या सुमारास पुणे-सोलापूर  राष्ट्रीय महामार्गावरील इंदापूरजवळच्या बळपुडी गावाजवळ त्यांच्या  तवेरा गाडीला (  एम एच ४६झेड २४४४ )   हा अपघात झाला. त्यांची गाडी एका डंपरला पाठीमागून धडकली.  अपघातानंतर आनंद शिंदे यांना इंदापूरमध्ये खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अपघातानंतर आनंद शिंदे सांगोल्याकडे रवाना झाले. गाडीत आनंद शिंदे यांच्यासह चौघेजण होते. सुदैवाने या अपघातातून शिंदे थोडक्यात बचावले असुन त्यांचा चालक गंभीर जखमी असल्याची माहिती मिळाली आहे.

कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. खणखणीत आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहे.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here