पुणे : कपड्याच्या दुकानाचे दरवाजे उचकटून चोरीचा प्रयत्न

0
355

कोरेगाव – भीमा (ता. शिरूर) येथे पुणे- अहमदनगर महामार्गाच्‍या लगतच्या कपड्याच्या दुकानाचे दोन दरवाजे उचकटून चोरीचा प्रयत्न करण्‍यात आला आहे. सोमवारी (दि. 26) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली आहे. यामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी कावेरी फॅशन हे कपड्याचे शोरूम महामार्गाच्या लगतच्या मारुती मंदिराच्या शेजारी सुरू झाले. सोमवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या बाजूचे आणि  महामार्गाच्या बाजूचे शेटर वाकवून दुकानात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परंतु दुकानात टफनच्या काचा असल्याने चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. अखेर दगडांनी काच फोडण्याचा देखील प्रयत्न झाला. सकाळच्यावेळी घटनेची माहिती परिसरात वाऱ्यासारखी पसरल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

ही बातमी शेअर करा :

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here